ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यापैकी एक महत्वाचा बदल म्हणजे आयकॉनिक ब्लू बर्ड लोगो काढून लोगोमध्ये 'X' दिसत आहे. मस्कला "X" नावाचे "सुपर अॅप" तयार करायचे आहे, जे चीनच्या WeChat सारखे आहे. मस्क यांनी ट्विट करत लोगोचे अनावरण केले आहे.
ट्विटरच्या नव्या लोगोची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कंपनीने ट्विटरचा लोगो बदलला आहे. त्याचबरोबर, ट्विटरचा लोगो बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही कंपनीने 'ब्लू बर्ड' लोगोऐवजी 'डॉजकॉइन' वापरला आहे. अब्जाधीश इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटर विकत घेतले. तेव्हापासून आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये अनेक मोठे बदल पाहिले आहेत.
या नव्या लोगोच्या घोषणेनंतर, ट्विटरने नवीन X ब्रँडिंगसाठी मार्ग काढण्याची हळूहळू प्रक्रिया सुरू केली. आत्तापर्यंत, अधिकृत ट्विटर हँडल नवीन X प्रोफाइल फोटोसह लोगो बदलले आहे. इलॉन मस्कनेही ट्विटरवर त्याचे प्रोफाइल पिक्चर देखील बदलले आहे.
नवीन बदलांचे लोकांकडून स्वागत होत असले तरी, अनेकांनी सोशल मीडिया साईटवर जाऊन ही 'वाईट कल्पना' असल्याचे सांगून याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर एका नेटकऱ्याने ही सर्वात मुर्खपणा असल्याचे म्हंटले आहे.
बरेच लोक याबद्दल मीम्स देखील शेअर करत आहेत. ब्लू बर्ड अॅपचा निरोप घेत अनेकांनी आनंदी ग्राफिक्स आणि व्हिडिओ शेअर केले.
नवीन लोगो हा आणखी एक बदल आहे जो मस्क ट्विटरवर करत आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतरचा हा सर्वात मोठा बदल आहे. मस्कने गेल्या वर्षी 44 अब्ज डॉलर्सच्या व्यवहारात ट्विटर विकत घेतले होते, त्यानंतर त्यांनी कंपनीत अनेक मोठे बदल केले, त्याचबरोबर अनेकांनी ट्विटरला रामराम केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.