Twitter New Feature : इलॉन मस्क यांना ट्विटर अधिकाधिक युजर फ्रेंडली बनवायचे आहे. यासाठी इलॉन मस्ककडून ट्विटरमध्ये वारंवार बदल करण्यात येत आहेत. आता अशी बातमी आहे की ट्विटर प्लॅटफॉर्मवर ऑडिओ आणि व्हिडिओ फीचर्स येणार आहेत.
यामुळे व्हॉट्सअॅपला थेट स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅपवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्स दोन्ही करता येतात. व्हॉट्सअॅपवरून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करणे पूर्णपणे विनामूल्य आहे.
ट्विटर ऑडिओ आणि व्हिडिओसाठी पैसे आकारू शकते
Twitter वरून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलसाठी पैसे आकारले जाऊ शकतात अशी बातमी आहे. पण ट्विटर आधीपासूनच सबस्क्रिप्शन मॉडेलवर चालत आहे. म्हणजे, ट्विटरच्या विशेष फीचर्सचा आनंद घेण्यासाठी, तुम्हाला ट्विटरची मेंबरशिप घेणं आवश्यक आहे.
ट्विटर आणि व्हॉट्सअॅप कॉलमधला फरक
मग प्रश्न पडतो की ट्विटर आणि व्हॉट्सअॅप कॉलमध्ये काय फरक आहे, तर व्हॉट्सअॅपवर कॉल करण्यासाठी मोबाइल नंबर आवश्यक आहे. याचा अर्थ तुम्ही इतर कोणत्याही देशात असाल तर तुमच्याकडे मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही व्हॉट्सअॅप ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल करू शकाल.
मात्र ट्विटरवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करण्यासाठी तुम्हाला नंबरची गरज भासणार नाही. ट्विटर युजर्स जगभरातील कोणत्याही देशात ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकतील.
इतर कोणीही कॉल ऐकू शकणार नाही
Twitter चा व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्स व्हॉट्सअॅपप्रमाणेच एन्क्रिप्ट केले जातील. म्हणजे कोणतीही तिसरी व्यक्ती ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल ऐकू किंवा रेकॉर्ड करू शकणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.