Twitter Live feature eSakal
विज्ञान-तंत्र

Twitter Live : आता 'एक्स'वरील लाईव्ह फीचरमध्ये मोठा बदल; इलॉन मस्कने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

X new feature : लाईव्ह व्हिडिओ फीचर आता अधिक चांगल्या प्रकारे काम करत असल्याचंही मस्क यांनी म्हटलं आहे.

Sudesh

एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. इलॉन मस्क यांनी याचं नाव, लोगो आणि कित्येक फीचर्स बदलले आहेत. आता याच्या लाईव्ह फीचरमध्येही बदल करण्यात आले आहेत.

इलॉन मस्क यांनी स्वतः लाईव्ह येत याबाबत माहिती दिली. लाईव्ह व्हिडिओ फीचरमध्ये बदल आणि सुधारणा करण्यात आल्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एका मिनिटाच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

काय केला बदल?

'एक्स'वर लाईव्ह येण्यासाठी आता यूजर्सना कंपोझर टॅबमध्ये असणाऱ्या कॅमेरा आयकॉनवर क्लिक करावं लागणार आहे. इलॉन मस्क यांनी आणखी एका ट्विटरमध्ये या आयकॉनचा फोटो दिला आहे. तसंच, लाईव्ह व्हिडिओ फीचर आता अधिक चांगल्या प्रकारे काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

असं करता येईल लाईव्ह

  • यासाठी तुम्हाला सर्वात आधी 'एक्स' अ‍ॅप उघडावं लागेल. यानंतर त्यात असणाऱ्या कम्पोझर पर्यायामध्ये जाऊन कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा.

  • यानंतर खालच्या बाजूला दिसणाऱ्या लाईव्ह या पर्यायावर टॅप करुन डिस्क्रिप्शन मध्ये माहिती भरा.

  • यानंतर गो लाईव्ह या पर्यायावर टॅप करा. हे केल्यानंतर तुम्हाला आपल्या फॉलोवर्सची टाईमलाईन आणि तुमच्या प्रोफाईलवर एक ट्विट दिसेल. यामध्ये तुम्ही लाईव्ह असाल.

  • तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ बंद करायचा असेल, तर स्क्रीनवर वरच्या बाजूला उजवीकडे असणाऱ्या स्टॉप पर्यायावर टॅप करा. यानंतर येणाऱ्या मेनूमधील पर्याय निवडून तुम्ही लाईव्ह बंद करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Share: रिलायन्सचे शेअर्स 70 टक्के वाढणार... एक्सपर्ट म्हणाले, खरेदी करा, काय आहे वाढीचे कारण?

Jalgaon Accident : गरोदर महिलेला घेऊन जाणा-या रुग्णवाहिकेचा भीषण स्फोट, वीस फूट दूर जाऊन उडाली अन्.... पहा व्हिडिओ

Baba siddiqui murder case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतरही 'त्याचं' समाधान झालं नव्हतं; चक्क लीलावतीमध्ये...

राजकीय वैर संपलं! तब्बल 40 वर्षांनंतर रमेश कदम, भास्कर जाधव एकाच मंचावर; दोघांमध्ये काय झाली चर्चा?

'सत्तेसाठी भाजपने पक्ष फोडाफोडी करून आमदार विकत घेऊन राजकारणाला कीड लावली'; खासदार कोल्हेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT