Play store Malware eSakal
विज्ञान-तंत्र

Google Play Store : दोन लोकप्रिय अ‍ॅप्समध्ये चिनी स्पायवेअर, १५ लाखांहून अधिक डाऊनलोड; लगेच करा डिलीट!

Sudesh

गुगल प्ले स्टोअरवरील अ‍ॅप्स आपण सहसा सुरक्षित समजून डाऊनलोड करतो. मात्र, यामध्ये देखील कधी कधी मालवेअर असणारे अ‍ॅप्स दिसून येतात. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. तब्बल १५ लाख लोकांनी डाऊनलोड केलेल्या दोन अ‍ॅप्समध्ये चक्क चिनी स्पायवेअर आढळून आलं आहे.

मोबाईल सिक्युरिटी कंपनी असलेल्या प्राडेओने ही माहिती समोर आणली आहे. या कंपनीने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, 'फाईल रिकव्हरी अँड डेटा रिकव्हरी' आणि 'फाईल मॅनेजर' असे हे दोन अ‍ॅप्स आहेत.

हे अ‍ॅप्स यूजर्सची गोपनीय माहिती चोरून ती चीनमध्ये असलेल्या सर्व्हर्सकडे पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे. गुगलच्या प्ले स्टोअरवर खरंतर 'नो डेटा कलेक्शन' पॉलिसी आहे. मात्र, या अ‍ॅप्सनी यातून छुपी वाट काढून यूजर्सचा डेटा चोरल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोणता डेटा चोरला?

या दोन्ही अ‍ॅप्सनी मिळून यूजर्सची कॉन्टॅक्ट लिस्ट, मीडिया फाईल्स, रिअल टाईम लोकेशन, नेटवर्क डीटेल्स, ऑपरेटिंग सिस्टीम आणि मोबाईल डिव्हाईसची माहिती चीनला पाठवलं आहे. चीनमधील केवळ एका नाही, तर वेगवेगळ्या सर्व्हर्सना ही माहिती पाठवली जात होती.

एका दिवसात शेकडो वेळा डेटा ट्रान्सफर केला जात होता. यासाठी हे अ‍ॅप्स यूजर्सना विविध प्रकारच्या परमिशन मागायचं. यूजर्सनी ही परवानगी दिल्याशिवाय अ‍ॅप्सचा वापरच करता येत नव्हता. शिवाय, हे अ‍ॅप्स अनइन्स्टॉल करण्याची प्रक्रिया देखील किचकट करून ठेवल्यामुळे यूजर्सना ते लवकर काढताही येत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT