Two wheeler servicing sakal
विज्ञान-तंत्र

100 रुपये वाचवणे पडेल महागात; गाडी सर्व्हिसिंग वेळी 'या' गोष्टींचा विचार नक्की करा

कंपनीच्या पॉलिसी समजून घ्या आणि तुमची गाडी अधिक काळ सुस्थितीत ठेवा

अर्चना बनगे

कोल्हापूर : आपण दुचाकी विकत घेतो. मात्र अनेकदा कंपनीची पॉलिसी किंवा विविध योजनांकडे दुर्लक्षच करतो. परिणामी कंपनीकडून मिळणाऱ्या अनेक सेवांपासून वंचित रहावे लागते. गाडी खरेदी केल्यानंतर तिचे वेळोवेळी सर्व्हिसिंग हा महत्त्वाचा मुद्दा असतो. कंपनीच्या नियमानुसार नियमित गाडी सर्व्हिसिंग केल्यास ती उत्तम चालते व चांगली सेवा देते. कधी-कधी शंभर- दोनशे रुपये वाचवण्यापायी तुमच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते. त्यामुळे तुम्ही जर नवी गाडी खरेदी केली असेल, तर नक्कीच कंपनीच्या पॉलिसी, सेवा, सूचना समजून घ्या. आणि तुमची गाडी अधिक काळ सुस्थितीत ठेवा. (Two Wheeler Servicing Tips)

गाडी खरेदी करताना

गाडी खरेदी (Bike Buying)करताना एक वर्ष बेसिक वॉरंटी असते. याचबरोबर दोन वर्षे इंजिन वॉरंटी असते. जर गाडी बदलून घेतली, तर तीन वर्षे वॉरंटी वाढवून मिळू शकते. कंपनीच्या नियमानुसार जनरल चेकअप आणि इंजिन आॅईल बदलावे लागेत. दिवसांनुसार किंवा किलोमीटरनुसार हा क्रिया करायची असते.

इअर आणि केअर पार्ट

गाडीच्या इअर आणि केअर (अनइलेक्ट्रिक) या भागांना कंपनी वॉरंटी देत नाही. मात्र शॉकॉप्सर, वायडिंग, लॉकशीट तसेच ८० टक्के रक्कम कव्हर करणाऱ्या वस्तुला कंपनी वॉरंटी देते. या भागांच्या किमती कंपनीपेक्षा बाहेर कमी असतात. म्हणून आपण तिथे गाडी दुरुस्त करुन घेतो, पण जर योग्य पध्दतीने जर दुरुस्ती झाली नाही, तर मात्र खिशाला मोठी कात्री बसू शकते.

आॅईल होते डॅमेज

आॅईल ग्रीड जेवढ्या लवकर खराब होतात तेवढ्याच वेगाने पार्ट खराब होतात. यामुळे गाडी कमी वेळातच ओव्हरव्ह्युला येऊ शकते. आणि याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो. त्यामुळे गाडीचे आॅईल (Oil)वेळेत बदलून घ्या.

कंपनी पाॅलिसी

कंपनी पाॅलीसीनुसार एका वर्षात चार वेळा सर्व्हिसिंगकरणे (Vehicle Servicing) अपेक्षित असते. यामध्ये चार सर्विसिंग फ्रि; तर चार सर्व्हिसिंग पेड स्वरुपात कराव्या लागतात. म्हणजे दोन वर्षांत आठ वेळा सर्व्हिसिंग करता येते. तुम्ही जर कंपनी नियमानुसार तेथेच गाडी सर्विसिंग करत असाल तर तुम्हाला कंपनी वॉरंटी देण्यास बंधनकारक राहते.

वेबसाईटवर मिळेल माहिती

नवी गाडी खरेदी करताना एकवेळ वेबसाईटला भेट द्या. तुम्हाला याठिकाणी गाडी विकत घेणे, गाडी विकणे, सुटे भाग याविषयी माहिती मिळेल. शिवाय गाडीची वॉरंटी, गॅरंटी तसेच सर्व्हिसिंगविषयी चार्ट पाहायला मिळेल. काही तक्रारी किंवा बदल सुचवायचे असतील तर तुम्ही याठिकाणी सुचवू शकता.

सर्वसाधारण अश्या पध्दतीचा सर्व्हिसिंग चार्ट असतो

Sl. No. Service Intervals(KMS) Days Coupons

1 1st 750-1000 30-45 Free

2 2nd 3500-4000 120-135 Free

3 3rd 6500-7000 240-255 Free

4 4th 9500-10000 365-380 Free

5 5th 12500-13000 485-500 Paid

6 6th 15500-16000 605-620 Paid

7 7th 18500-19000 725-740 Paid

8 8th 21500-22000 845-860 Paid

नवी गाडी खरेदी करताना त्या कंपनीची पॉलिसी जाणून घ्या. तसेच योग्यवेळी सर्व्हिसिंग करुन घ्या. यामुळे गाडी जास्त काळ टिकण्याची क्षमता वाढते.

विनायक जाधव, वर्कशाॅप मॅनेजर, कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT