Aadhaar Card update Rules : आजच्या काळात आधार कार्ड हे ओळखीचे अत्यावश्यक दस्तऐवज बनले आहे. शासकीय योजनांपासून ते बँकिंग व्यवहारांपर्यंत, आधार कार्डाशिवाय कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होणे कठीण आहे. मात्र, आधार कार्डवरील चुकीच्या माहितीमुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी आधार कार्डवरील माहिती दुरुस्त करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) सुविधा उपलब्ध करून देते.
UIDAI ने नाव बदलण्यासाठीच्या नियमांमध्ये आता मोठा बदल केला आहे. आधार कार्डावरील नावात बदल करायचा असल्यास, राजपत्र अधिसूचना (Gazette Notification) सादर करणे अनिवार्य केले आहे. याशिवाय, नावाच्या दुरुस्तीसाठी दुसरा ओळख पुरावा देखील आवश्यक आहे. यात पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, सेवा ओळखपत्र किंवा पासपोर्ट यांचा समावेश आहे.
UIDAI ने हा निर्णय फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी घेतला आहे. पूर्ण नाव बदलायचे असो किंवा केवळ काही अक्षरांमध्ये सुधारणा करायची असो, नवीन अटी लागू होणार आहेत. यामुळे आधारवर नाव दुरुस्तीची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाली आहे.
नाव दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेत कठोरता आणल्याबरोबर UIDAI ने पत्ता दुरुस्ती आणि नवीन आधार नोंदणीसाठी मात्र प्रक्रिया सोपी केली आहे. सार्वजनिक बँकेच्या पासबुकचा वापर करून तुम्ही आता पत्ता बदलू शकता. यामुळे पत्ता बदलण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.
UIDAI च्या या नव्या निर्णयामुळे नाव बदलण्याच्या प्रक्रियेत कठोरता आल्यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, ग्राहकांसाठी काही प्रमाणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधारवरील कोणत्याही दुरुस्तीसाठी योग्य कागदपत्रे उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
UIDAI च्या नव्या नियमांमुळे नाव दुरुस्ती प्रक्रियेसाठी नागरिकांनी आधीपासूनच आवश्यक कागदपत्रांची तयारी करणे गरजेचे आहे. आधार कार्ड हे आपल्या ओळखीचा मूलभूत दस्तऐवज असल्याने त्यावरील माहिती अचूक ठेवणे अत्यावश्यक आहे. UIDAI च्या या नव्या नियमांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि गरज असल्यास आधीच प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.