September 2024 car launches india esakal
विज्ञान-तंत्र

Car Launch in September : यंदाचा सप्टेंबर कार प्रेमींसाठी खास! लाँच होणार या ब्रँड कार,एकदा बघाच

Saisimran Ghashi

Car Launch Update : कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा सप्टेंबर महिना कार प्रेमींसाठी खास असणार आहे. विविध कंपन्या नवीन कार्स लाँच करून मार्केट गाजवण्यास सज्ज आहेत. आगामी सणासुदीचा फायदा घेऊन कंपन्या इलेक्ट्रिक आणि एसयूव्ही अशा विविध पर्यायांसह आकर्षक कार्स लाँच करणार आहेत. चला तर या महिन्यात कोणत्या कार्स लॉन्च होणार आहेत याची झलक पाहूया.

टाटा कर्व्ह ICE (Tata Curvv ICE)

टाटा मोटर्स 2 सप्टेंबरला त्यांच्या 'कर्व्ह' या मिड-साइज SUV चे लाँचिंग करणार आहे. या गाडीत पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनचे पर्याय असतील. कर्व्हमध्ये दोन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन्स, 1.2-लिटर आणि नवीन 1.2-लिटर TGDi टर्बो, तसेच 1.5-लिटर डिझेल इंजिन असेल. या सर्व इंजिन्ससाठी 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध असेल. भारतात डिझेल इंजिनसोबत DCT देणारी ही पहिलीच मास-मार्केट SUV असेल.

मर्सिडीज-मायबॅक EQS SUV (Mercedes-Maybach EQS SUV)

5 सप्टेंबर रोजी मर्सिडीज-बेंझ त्यांची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक SUV, मर्सिडीज-मायबॅक EQS SUV लाँच करणार आहे. या EV SUV ची रेंज सुमारे 600 किमी असल्याचे कंपनीने सांगितले आहे. 108.4 kWh बॅटरीसह दोन मोटर्स प्रत्येक अॅक्सलवर देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे 658 bhp पॉवर आणि 950 Nm टॉर्क उत्पन्न होतो. या SUV मध्ये मागील सीटसाठी 11.6-इंच डिस्प्ले आणि कंट्रोलसाठी MBUX टॅबलेटही असेल.

हुंडई अल्काझार (Hyundai Alcazar)

हुंडई 9 सप्टेंबरला रोजी 'अल्काझार' चा नवीनतम फेशलिफ्ट मॉडेल लाँच करणार आहे. ही 6 सीटर SUV, क्रेटा प्रेरित डिझाइन अपग्रेडसह येईल. नवीन अल्काझारमध्ये 10.25-इंचांच्या दोन स्क्रीन, नवीन सीट्स, आणि दोन्ही रांगा साठी व्हेंटिलेटेड सीट्स असतील. तसेच, 2024 अल्काझारला लेव्हल 2 ADAS तंत्रज्ञानाचा समावेश असेल. इंजिन पर्यायांमध्ये 1.5-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन उपलब्ध असेल.

एमजी विंडसर EV ( MG Windsor EV )

JSW MG त्यांचा तिसरा इलेक्ट्रिक वाहन, विंडसर EV, सप्टेंबरमध्ये लाँच करणार आहे. हे वाहन कॉमेट EV आणि ZS EV यांच्यामध्ये स्थान घेईल. 50.3 kWh बॅटरी असलेल्या या गाडीची रेंज सुमारे 460 किमी असेल. यामध्ये 15.6-इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम, 360-डिग्री कॅमेरा, 8.8-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आणि अनेक आधुनिक फीचर्स असतील.

सप्टेंबरमध्ये या सर्व नव्या गाड्या बाजारात येणार असून, ऑटोमोटिव्ह उत्साहींसाठी एक रोमांचक महिना असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

Pune to Bangkok flight: गुड न्यूज! पुण्यातून बँकॉक अन् दुबई विमानसेवेला मंजुरी; 'या' तारखेपासून होणार उड्डाण

ReNew Company: नागपूरमधील प्रकल्प गुजरातला गेल्याच्या बातमीत किती तथ्य? कंपनीचं स्पष्टीकरण आलं समोर

IND vs BAN: विराट आऊट... रोहित नाराज; मात्र चेन्नईचे चाहते सुस्साट, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT