upcoming smartphones in February 2022  
विज्ञान-तंत्र

फेब्रुवारीत भारतात लॉंच होतील 'हे' स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

Upcoming Smartphones in February 2022 : येत्या काही दिवसांत भारतात अनेक दमदार स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. यामध्ये सॅमसंग, रेडमी आणि ओप्पो ब्रँडच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. साधारणतः फेब्रुवारी 2022 मध्ये, सर्व मोठे स्मार्टफोन निर्माते त्यांचे प्रीमियम स्मार्टफोन लॉन्च करतील. तसेच Xiaomi द्वारे एक मेगा इव्हेंट आयोजित केला जात आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि स्मार्ट बँडसह अनेक उत्पादने लाँच केली जातील. वाचा सविस्तर..

Oppo Reno 7 Series

लाँच तारीख - 4 फेब्रुवारी 2022

अपेक्षित किंमत - 25,000 ते 45,000 रुपये

Oppo Reno 7 सीरीज अंतर्गत चार स्मार्टफोन्स लाँच केले जाऊ शकतात, Oppo Reno 7 5G, Oppo Reno 7 Pro, Oppo Reno 7 Pro 5G आणि Oppo Reno 7 SE 5G. OPPO Reno7 SE चीनमध्ये 6.43 इंच AMOLED फुल एचडी प्लस डिस्प्लेसह लॉंच करण्यात आला आहे. यामध्ये 90HZ रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाईल. फोन इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर सपोर्टसह येतो तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. तर फोनच्या मागील पॅनलवर 48-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा उपलब्ध असेल. याशिवाय 2-मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो लेन्स दिला जाऊ शकतो. फोनला डायमेंसिटी 900 चिपसेट सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे. हा फोन Android 11 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. पॉवर बॅकअपसाठी, फोनला 4,500mAh बॅटरी मिळेल. ज्याला 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.

Redmi Note 11S

लाँच तारीख - 9 फेब्रुवारी 2022

कंपनीने कंफर्म केले आहे की Redmi Note 11S स्मार्टफोन 108MP क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह ऑफर केला जाईल. फोन एमोलेड डिस्प्ले तसेच 5G ऐवजी 4G कनेक्टिव्हिटी मिळेल. Redmi Note 11S स्मार्टफोनमध्ये 108-मेगापिक्सेल ISOCELL HM2 सेंसर दिला जाऊ शकतो. फोन 8-मेगापिक्सेल Sony IMX355 सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स सपोर्टसह येईल. याशिवाय 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर सपोर्ट दिला जाईल. फोनमध्ये MediaTek चिपसेट मिळणार असून तो Android 11 आधारित MIUI 13 वर काम करेल.

Samsung Galaxy S22 Series

लाँच तारीख - 9 फेब्रुवारी 2022

Samsung Galaxy S22 Ultra मध्ये 6.8-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच फोन Exynos 2200 SoC किंवा Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह येईल. Samsung Galaxy S22 Ultra साठी 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शन्ससह 8GB आणि 12GB रॅम व्हेरिएंट असतील. फोन 5,000mAh बॅटरीसह लॉंच केला जाऊ शकतो. Samsung Galaxy S22 च्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, यात अल्ट्रा 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 108-मेगापिक्सेल वाइड अँगल शूटर, 3X ऑप्टिकल झूम ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 10-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स मिळेल. त्याच वेळी, दुसरा 10-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स 10X झूम आणि OIS सह येईल. Galaxy S22 Ultra 40-मेगापिक्सेल सेल्फी स्नॅपरसह येईल अशी अफवा आहे.

रेडमी स्मार्ट टीव्ही X43

लाँच तारीख - 9 फेब्रुवारी 2022

Xiaomi चा नवीन स्मार्ट टीव्ही भारतात 9 फेब्रुवारी 2022 ला लॉन्च होईल. हा स्मार्ट टीव्ही 43 इंच स्क्रीन आकारात येईल. या दिवशीच Redmi Note 11S स्मार्टफोन देखील लॉन्च होईल. Redmi X43 4K स्मार्ट टीव्ही HDR आणि डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येतो, तसेच यात 30W स्पीकर, पॅच वॉल ओएस मिळेल.

OnePlus Nord CE 2 5G

लाँच तारीख - 11 फेब्रुवारी 2022

OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याबद्दल अधिक तपशील उपलब्ध नाहीत. पण लीक झालेल्या रिपोर्टनुसार, OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनमध्ये कॅमेरा मॉड्यूल आणि LED फ्लॅश लाईट देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT