Smartphones Sakal
विज्ञान-तंत्र

Upcoming Smartphones: नवीन स्मार्टफोन खरेदी करायचाय? डिसेंबरमध्ये लाँच होणाऱ्या फोन्सची लिस्ट एकदा पाहाच

डिसेंबर २०२२ मध्ये भारतीय बाजारात एकापेक्षा एक स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. यामध्ये रेडमी, सॅमसंगच्या फोन्सचा समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

Upcoming Mobile Phones: वर्ष २०२२ चा शेवटचा महिना सुरू आहे. तुम्ही जर नववर्षाच्या निमित्ताने नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. डिसेंबर महिन्यात भारतीय बाजारात एकापेक्षा एक शानदार फोन्स लाँच होणार आहेत. यामध्ये iQOO 11, Vivo Y02, Realme 10 Pro सारख्या हँडसेट्सचा समावेश आहे. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

Vivo Y02

Vivo ने आपल्या कमी बजेटमध्ये येणाऱ्या या स्मार्टफोन्सला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच केले आहे. या फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी, मीडियाटेक ऑक्टा-कोर प्रोसेसर, ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज, ८ मेगापिक्सल मुख्य रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनची किंमत ८,९९९ रुपये आहे.

Realme 10 Pro

Realme 10 Pro सीरिज अंतर्गत दोन फोन लाँच होणार आहेत. कंपनी ८ डिसेंबरला Realme 10 Pro आणि Realme 10 Pro+ स्मार्टफोन्सला लाँच करेल. या फोन्सची किंमत २५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले आणि १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

iQOO 11

iQOO 11 सीरिज ८ डिसेंबरला भारतात लाँच होणार आहे. या सीरिज अंतर्गत iQOO 11 आणि iQOO 11 Pro स्मार्टफोन्स लाँच होतील. फोन Qualcomm Snapdragon ८ Gen २ प्रोसेसर, ४७०० एमएएच बॅटरी आणि २०० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

Redmi Note 12

Redmi आपले दोन नवीन स्मार्टफोन्स Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ ला डिसेंबर महिन्यात लाँच करणार आहे. हे फोन मीडियाटेक डायमेंसिटी १०८० चिपसेट आणि ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येईल. हा कॅमेरा Sony IMX७६६ सेंसरसह येईल.

Samsung Galaxy M04

Samsung Galaxy M04 स्मार्टफोन पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. या फोनची किंमत १० हजार रुपयांच्या रेंजमध्ये असू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT