Upcoming SUV Cars : या वर्षी जवळपास प्रत्येक सेगमेंटमध्ये अनेक नवीन कार बाजारात दाखल होणार आहेत. सध्या देशात मध्यम आकाराच्या एसयूव्ही कारला मोठी मागणी आहे. या सेगमेंटमध्ये, Hyundai Creta ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार राहिली आहे. या कारला टक्कर देण्यासाठी या वर्षी तीन नवीन कार बाजारात येणार आहेत. चला तर मग पाहूया या गाड्यांची यादी.
Citroen C3 Aircross SUV
फ्रेंच ऑटोमेकर 27 एप्रिल 2023 रोजी आपली C3 Aircross SUV लॉन्च करणार आहेत. ही कार कंपनी C-Cubed प्रोग्राम अंतर्गत येणार आहे. त्याची लांबी सुमारे 4.2 मीटर असणे अपेक्षित आहे. यात 5 आणि 7-सीटिंग कॉन्फिगरेशनचा पर्याय मिळेल. हे C3 हॅचबॅकसह CMP मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल. यात 1.2L, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल, जे 110bhp पॉवर आणि 190Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
नवीन होंडा एसयूव्ही
Honda ची नवीन मध्यम आकाराची SUV जून 2023 मध्ये सादर होणार आहे. ही मेड फॉर इंडिया मॉडेल सिटी प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल. त्याचे डिझाइन घटक कंपनीच्या जागतिक मॉडेलसारखे असतील. या SUV मध्ये 1.5L iVTEC पेट्रोल इंजिन मिळू शकते. जे 121bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल. यात 6-स्पीड मॅन्युअल किंवा CVT गिअरबॉक्सचा पर्याय मिळू शकतो. तसेच, हे अॅटकिन्सन सायकल 1.5L पेट्रोल इंजिन 126bhp ची पॉवर जनरेट करणारी एक मजबूत हायब्रिड प्रणाली देऊ शकते.
किआ सेल्टोस फेसलिफ्ट
Kia Motors या वर्षाच्या मध्यात आपली फेसलिफ्टेड सेल्टोस एसयूव्ही सादर करणार आहे. त्याच्या डिझाइन, इंटीरियर आणि हुडमध्ये अनेक बदल केले जातील. SUV ला सध्या 1.4L टर्बो पेट्रोल इंजिनच्या जागी नवीन 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल जे 120bhp पॉवर जनरेट करते. नवीन इंजिन 160bhp पॉवर आणि 253Nm टॉर्क जनरेट करेल. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळू शकतो. यासोबतच सध्याच्या 1.5L पेट्रोल आणि 1.5L टर्बो डिझेल इंजिनचा पर्यायही उपलब्ध असेल. ही कार एडीएएस प्रणालीने सुसज्ज असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.