Technology  Sakal
विज्ञान-तंत्र

Future technology: 'ही' टेक्नोलॉजी बदलणार जग, काम पाहून तुम्ही व्हाल अवाक

वर्ष २०२३ मध्ये अनेक भन्नाट टेक्नोलॉजी पाहायला मिळणार आहेत, ज्यामुळे अनेक मोठे बदल घडू शकतात. अशाच अपकमिंग टेक्नोलॉजीविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Latest Technology Trends 2023: आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात AI चा उपयोग प्रचंड वाढला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एआयचा वापर केला जात आहे. याचेच एक उदाहरण ChatGPT हे आहे. मात्र, वर्ष २०२३ मध्ये अनेक भन्नाट टेक्नोलॉजी पाहायला मिळणार आहेत, ज्यामुळे अनेक मोठे बदल घडू शकतात. अशाच अपकमिंग टेक्नोलॉजीविषयी सविस्तर जाणून घेऊया.

IoT आणि 5G ने बदलणार जग

भारतात ५जी सेवा सुरू झाली आहे. मात्र, सध्या ही सेवा ठराविक भागातच मर्यादित आहे. जसजसे ५जी चा वापर वाढेल, तसतसे इंटरनेट ऑफ थिंग्सचा (IoT) ट्रेंड देखील वाढताना दिसेल. इंटरनेट केवळ मोबाइल, कॉम्प्युटर पुरताच मर्यादित न राहता, इतरही डिव्हाइसपर्यंत पोहेचल. IoT मुळे स्मार्ट सिटी, रोबॉटद्वारे होणारे शेती आणि सेल्फ-ड्राइव्हिंग हायवे सिस्टमचा विकास करणे सोपे होईल.

ह्यूमन-कॉम्प्युटर इंटरफेसचा दबदबा वाढणार

ह्यूमन-कॉम्प्युटर इंटरफेसद्वारे व्हेयरेबल डिव्हाइस आणि टेक्नोलॉजीच्या विकासात मदत मिळेल. याचे सर्वोत्तम उदाहरण स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर आहे. स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर बँड्सच्या मदतीने सहज आरोग्याशी संबंधित डेटा मिळतो. या डिव्हाइसचा वापर करणे देखील खूपच सोपे आहे.

मात्र, हे केवळ एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. कपड्यांपासून ते बुटांपर्यंत सर्व गोष्टी ह्यूमन-कॉम्प्युटर इंटरफेसचा वापर होईल. टेक्नोलॉजीची खास गोष्ट म्हणजे जेवढी आधुनिक होते, तेवढेच डिव्हाइस लहान असते. पुढील काही दिवसात स्मार्ट ग्लासची जागा स्मार्ट कॉन्टॅक्ट लेंस घेऊ शकतात. त्यानंतर स्मार्ट कॉन्टॅक्ट लेंसला स्मार्ट आय इम्प्लांट रिप्लेस करतील.

हेही वाचा: Smartphone Tips: वारंवार फोन चार्ज करावा लागतोय? बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

ब्लॉकचेन

क्रिप्टोकरन्सी ज्या टेक्नोलॉजीवर आधारित आहे, त्या ब्लॉकचेनचा भविष्यात मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो. डिसेंट्रलाइज्ड असल्याने एखाद्या ठराविक लोकेशनवर स्टोर करण्याची गरज नाही. त्यामुळे रेकॉर्ड टेम्पर होण्याची देखील शक्यता नसते. पुढील काही दिवसात संस्था याचा वापर डेटा स्टोरसाठी करू शकता. हा डेटा कोणीच डिलीट अथवा हॅक करू शकणार नाही.

ब्लॉकचेनचा उपयोग हॉस्पिटलमधील हेल्थ रेकॉर्ड स्टोर करण्यासाठी देखील होईल. पुढील काही वर्षात ऑनलाइन मतदान देखील याद्वारे शक्य आहे.

एक्सटेंडेड रिएलिटी (XR)

व्हर्च्यूअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी आणि मिक्स्ड रियालिटीचे शॉर्ट व्हर्जन एक्सटेंडेड रियालिटी अथवा XR आहे. या टेक्नोलॉजीद्वारे यूजर्सला इमर्सिव्ह डिजिटल एक्सपीरियन्स मिळेल. ब्रँड इंगेजमेंटला बूस्ट करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. XR टेक्नोलॉजीमुळे जग पाहण्याचा नवा अनुभव मिळेल. मेटाव्हर्समध्ये देखील एक्सआरचा वापर आभासी जग एक्स्प्लोर करण्यासाठी होईल.

3D प्रिटिंग

3D प्रिटिंगमुळे उत्पादनाच्या क्षेत्रात नवीन क्रांती येऊ शकते. मॅन्यूफॅक्चरिंग आणि इतर क्षेत्रात यामुळे मोठा बदल पाहायला मिळेल.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या, आज तीन तासांचा ब्लॉक!

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

SCROLL FOR NEXT