UPSC New Update AI Use in exam system IAS Pooja Khedkar esakal
विज्ञान-तंत्र

UPSC Update : UPSC मध्ये AI ची एन्ट्री! पूजा खेडकर प्रकरणातून घेतला धडा, परीक्षा प्रक्रियेत होणार मोठा बदल

Saisimran Ghashi

UPSC Trending : देशातील सर्वात प्रतिष्ठित असलेल्या यूपीएससी परीक्षेत फसवणूक करणाऱ्या उमेदवारांना आता आळा बसणार आहे. पुजा खेडकर यांनी विकलांग असल्याच संगत खोटी ओळख वापरून आयएएस झाल्याच्या धक्कादायक प्रकरणानंतर यूपीएससीने परीक्षेतील अनियमितता रोखण्यासाठी कंबर कसली आहे.त्यामध्ये यूपीएससी साथ देण्यासाठी आता एआय म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता मैदानात उतरली आहे.

यूपीएससी दरवर्षी १४ परीक्षा घेते. त्यातून देशाला प्रशासकांची भरती होते. या परीक्षांमध्ये होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी यूपीएससीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी यूपीएससीने निविदा काढल्या आहेत. आधुनिक बायोमेट्रिक तंत्रज्ञान, आधार आधारित बोटांच्या ठशांची पडताळणी, चेहऱ्याची ओळख पद्धती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे सीसीटीव्ही देखरेख या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी यूपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील ५ लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेत बसले होते. त्यामुळे परीक्षेची पारदर्शिता वाढविण्यासाठी ही पाऊले महत्त्वाची मानली जात आहेत.

पुजा खेडकर यांनी खोटी ओळख वापरून आयएएस झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर यूपीएससीने या निर्णयाला गती दिली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच यूपीएससीने परीक्षेची सुरक्षा कवच घट्ट करण्याचे ठरविले आहे.

यामुळे पुढच्या परीक्षांमध्ये फसवणूक करणाऱ्या उमेदवारांना मोठा धक्का बसणार आहे. यामुळे परीक्षेची निष्पक्षता आणि पारदर्शिता वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या देशभरात आयएएस पूजा खेडकरचे प्रकरण गाजत असताना यूपीएससीने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.

यूपीएससी ही राष्ट्रीय पातळीवरील सर्वात उच्च स्थानाची परीक्षा आहे. यातून आयएएस,आयपीएस यांसारखी मोठी पदे भरली जातात. या परीक्षेमध्येच घोटाळा झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर यूपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

SCROLL FOR NEXT