Jio sakal
विज्ञान-तंत्र

Jio युजर्सना आणखी एक धक्का! 'हे' 4 महत्त्वाचे प्रीपेड प्लॅन्स बंद

Jio युजर्सना आणखी एक धक्का! 'हे' 4 महत्त्वाचे प्रीपेड प्लॅन्स बंद

सकाळ वृत्तसेवा

रिलायन्स Jio ने चार सर्वांत स्वस्त प्लॅन देखील बंद केले आहेत.

देशातील आघाडीची नेटवर्क प्रोव्हायडर कंपनी रिलायन्स Jio (Reliance Jio) ने या महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपले सर्व प्लॅन महाग केले आहेत. यासोबतच, कंपनीने 4 सर्वांत स्वस्त प्लॅन देखील बंद केले आहेत. म्हणजेच, आता तुम्ही 499 रुपये, 699 रुपये, 888 रुपये आणि 2,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये रिचार्ज करू शकणार नाही. कारण, हे प्लॅन्स आता Jio वेबसाइटवर दिसणार नाहीत. Jio ने हे चार नवीन प्रीपेड प्लॅन (Jio Prepaid Plan) सप्टेंबरमध्ये Disney + Hotstar या मोबाईल सबस्क्रिप्शनसह लॉंच केले होते. पण या प्लॅन्सच्या बदल्यात Jio ने बदललेल्या किमतीत काही नवीन प्लॅन जोडले आहेत, ज्यातून तुम्हाला रिचार्जवर पूर्वीपेक्षा बरेच फायदे मिळू शकतात.

रिलायन्स जिओकडे सध्या फक्त 601 रुपयांचा प्लॅन आहे जो डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह येतो. रु. 499, रु. 666, रु. 888 आणि रु. 2,499 प्लॅन 28 नोव्हेंबर रोजी टेलिकॉम ऑपरेटरने जारी केलेल्या टेरिफ वाढीच्या यादीचा भाग नाहीत. जिओच्या 601 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला दररोज 3 जीबी डेटा आणि ओटीटी बेनिफिटसह 6 जीबी बोनस डेटा दिला जातो.

जिओच्या 601 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, Jio Cinema, Jio Tv व्यतिरिक्त, तुम्हाला या प्लॅनमध्ये इतर फायद्यांचा लाभ मिळतो. 601 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे, म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 90 GB डेटा दिला जात आहे.

आता Jio 56 दिवसांच्या वैधतेसह 3 GB डेली डेटा प्लॅन ऑफर करत नाही. टेरिफ वाढल्यानंतर Jio 1199 आणि 4199 रुपयांमध्ये 3 GB डेली डेटा ऑफर करत आहे. 1199 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 GB डेटा मिळतो आणि त्याची वैधता 84 दिवस आहे. हे अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएससह येते. 4199 रुपयांचा प्लॅन दररोज 3 GB डेटा ऑफर करतो आणि 365 दिवसांच्या वैधतेसाठी येतो. हे अमर्यादित कॉल, 100 एसएमएस आणि Jio ऍप्समध्ये प्रवेश देखील देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT