Earbuds sakal
विज्ञान-तंत्र

टेक्नोहंट : ऐकू आनंदे...

सकाळ वृत्तसेवा

- वैभव गाटे

इअरबड्सची मागणी वाढत असल्याने उत्पादक कंपन्या नवनवे फिचर्स देऊन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. नुकतेच बोट, एचपी, बोल्ट ऑडिओ, विंग्स या कंपन्यांनी बाजारात दमदार बॅटरी क्षमता असलेले इअरबड्स लॉन्च केले आहेत. जे सलग ५.३० तास वापरता येत असून चार्जिंग केससहित त्यांची बॅटरी किमान ४० तासांपर्यंत असल्याचा दावा कंपन्या करतात.

बोट एअरडॉप्स १७०

या इअरबड्समध्ये बेस्ट बिल्ड क्वालिटीसह उत्तम प्रकारे बास बॅलन्स करण्यात आला आहे. ब्लूटूथ व्ही ५.३ असलेल्या या इअरबड्सची रेंज १२ मीटरपर्यंत आहे. डिसेंट कॉल क्वालिटी असलेले हे इअरबड्स इनडोर वापरासाठी चांगले आहेत.

स्पेसिफिकेशन : बॅटरी : इअरबड ५ तास, चार्जिंग केससहित ४० तास. माइक : प्रति इअरबड २ माइक (एकूण ४)

आयपीएक्स ४ वॉटर रेजिस्टंट

फास्ट चार्जिंग टाइप सी-पोर्ट, व्हाइस असिस्टंट, टच कंट्रोल

किंमत : १,५०० रुपये

एचपी पोली व्होयेजर फ्री ६०+ यूसी

नाॅइज कॅन्सलिंग फिचरसोबत अत्यंत स्पष्ट आवाजात कॉलिंग फिचर देणारा हा इअरबड आहे. चांगली बिल्ड क्वालिटी आणि डिझाइनमुळे दिवसभर वापरूनही कानाला कोणताही त्रास जाणवणार नाही.

स्पेसिफिकेशन : ब्लूटूथ व्ही ५.३. बॅटरी : इअरबड ५.३० तास, चर्जिंग केससहित ११ तास

माइक : प्रति इअरबड ३ माइक (एकूण ६)

आयपी ५४ डस्ट रेजिस्टंट

क्यूआय वायरलेस चर्जिंग केस, स्मार्ट सेंसर

किंमत : ४१,९९९ रुपये

बोल्ट ऑडिओ एक्स १०

हेवी बासमध्ये गाण्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी हा इअरबड उत्तम पर्याय आहे. क्लिअर ऑडिओ क्वालिटी ही याची खासियत आहे. गेमिंगचा आनंद लुटण्यासाठीही चांगला पर्याय आहे.

स्पेसिफिकेशन : ब्लूटूथ व्ही ५.३ (१२ मीटर रेंज)

बॅटरी : इअरबड ५ तास, चार्जिंग केससहित ४० तास

माइक : प्रति इअरबड २ माइक (एकूण ४)

विंग्स फॅन्टम ८५०

याच्या डिझाइनवरून हा गेमिंगसाठी तयार करण्यात आलेला मोठी बॅटरी असलेला इअरबड असल्याचे लक्षात येते. याच्या केसमध्ये एलईडी लाइट्स आहेत. यांची साऊंड क्वालिटी डिसेंट आहे.

स्पेसिफिकेशन : ब्लूटूथ व्ही ५.३ (१५ मीटर रेंज) बॅटरी : इअरबड १० तास, चार्जिंग केससहित ५० तास

माइक : प्रति इअरबड २ माइक (एकूण ४)

आयपीएक्स ५

गेमिंग मोड, व्हाइस असिस्टंट, फास्ट चार्जिंग टाइप सी-पोर्ट, टच कंट्रोल

किंमत : १,५०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT