विज्ञान-तंत्र

टेक्नोहंट : बजेट फ्रेंडली टॅब्लेट्स

मोठ्या स्क्रीनवर काम करण्याची, मनोरंजनाचा आनंद लुटण्याची मजाच काही और असते. त्यामुळे बरेच जण टॅब्लेट्स घेणे पसंत करतात.

सकाळ वृत्तसेवा

- वैभव गाटे

मोठ्या स्क्रीनवर काम करण्याची, मनोरंजनाचा आनंद लुटण्याची मजाच काही और असते. त्यामुळे बरेच जण टॅब्लेट्स घेणे पसंत करतात. सध्या कॉर्पोरेट क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र व अन्य क्षेत्रात टॅबलेट्सचा वापर वाढला आहे. त्यामुळे सर्वच कंपन्या एकापेक्षा एक टॅब्लेट्स बाजारात आणत आहेत. यातील काही बजेट फ्रेंडली; पण उत्तम फीचर्स देणारे लेटेस्ट टॅब्लेट्स पाहूयात.

१. एसर वन १०/ वन ८

एसरने नुकतेच बजेट रेंजमध्ये; पण बिग बॅटरी टॅबलेट्स ‘असर वन १० आणि असर वन ८’ लॉंच केले आहेत. या दोन्हीमध्ये ऑक्टा-कोर मीडिया टेक प्रोसेसर आहे. एसर वन १० चा बॅटरी बॅकअप ७,००० एमएएच असून ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी फ्लॅश मेमरी देण्यात आली आहे. तर १३ एमपीचा ड्युअल रेअर कॅमेरा आणि सोनी सेन्सर देण्यात आला असून ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. एसर वन ८ मध्ये ५,१०० एमएएच बॅटरी बॅकअप असून ८ एमपीचा रेअर, तर २ एमपीचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी फ्लॅश मेमरी देण्यात आली आहे.

किंमत - एसर वन १० :१७,९९० रुपये

एसर वन ८ : १२,९९० रुपये

२. रिअलमी पॅड २

बिग बॅटरी आणि वेगवान असा टॅब्लेट पॅड २ रिअलमीने नुकताच लॉन्च केला. यात मीडिया टेक हेलिओ जी ९९ हा प्रोसेसर देण्यात आला असून, सलग १७ तास व्हिडिओ स्ट्रिमिंग करता येईल इतकी बॅटरी दिल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये ८,३६० एमएएचची बिग बॅटरी दिलेली आहे. ११.५ इंच डिस्प्ले, ८ एमपी रेअर कॅमेरासह यात १२० हर्ट्सचा रिफ्रेश रेट दिलेला आहे.

किंमत - रिअलमी पॅड २ :

१९,९९९ रुपये (१२८ जीबी)

२२,९९९ रुपये (२५६ जीबी)

३. विवो पॅड एअर

साधारणतः डिसेंबरमध्ये लॉंच होणाऱ्या या टॅबची फास्ट चार्जर, बिग बॅटरी आणि वेगवान अशी खासियत असेल. यात कॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८७० चा प्रोसेसर देण्यात आला आहे. ११.५ इंच डिस्प्लेसह १४४ हर्ट्सचा रिफ्रेश रेट दिलेला असेल. हा टॅब अॅण्ड्राइड १३ वर आधारित असेल. यातील कॅमेरा, रॅम, स्टोरेजबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.

किंमत : २०,५९९ रुपये (अंदाजे)

४. होनर पॅड एक्स ९

पॅड एक्स ८ ला मिळालेल्या प्रतिसादानंतर होनरने नुकताच एक्स ९ टॅबलेट लॉंच केला. ७,२५० एमएएचची बॅटरी असलेल्या या टॅबमध्ये ११.५ इंचचा डिस्प्ले, १२० हर्ट्सचा रिफ्रेश रेट, ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर दिलेला आहे. १२८ जीबी स्टोरेजसह यात ४ जीबी रॅम आणि ५ एमपीचा रेअर, फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा टॅब अॅण्ड्राइड १३ वर आधारित आहे.

किंमत : १४,४९९ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT