Sanchar Sathi App sakal
विज्ञान-तंत्र

टेक्नोहंट : हरवलेला मोबाइल ट्रॅक करणारा ‘संचारसाथी’

मोबाइल चोरी झाल्यावर किंवा हरवल्यावर ‘गुगल फॉईंड माय डिव्हाइस’ या ॲपचा वापर आपण प्राधान्याने करतो, परंतु त्याला पर्यायी पोर्टल सरकारने भारतीयांसाठी निर्माण केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

- वैभव गाटे

मोबाइल चोरी झाल्यावर किंवा हरवल्यावर ‘गुगल फॉईंड माय डिव्हाइस’ या ॲपचा वापर आपण प्राधान्याने करतो, परंतु त्याला पर्यायी पोर्टल सरकारने भारतीयांसाठी निर्माण केले आहे. ते म्हणजे ‘संचारसाथी’. याद्वारे आपण आपला मोबाइल घरच्या घरी ट्रॅक तर करू शकतोच, शिवाय ब्लॉकही करू शकतो. जागतिक दूरसंचार दिनी म्हणजेच १७ मे रोजी सरकार हे पोर्टल देशभरात लॉन्च करत आहे.

सेंटर फॉर डिपार्टमेंट ऑफ टेलिमॅटिक्सद्वारे (सी-डॉट) महाराष्ट्र (मुंबई), दिल्ली, कर्नाटकातील काही दूरसंचार कार्यालयात सध्या या प्रणालीचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येत आहे. या यशस्वी प्रयोगानंतर संपूर्ण भारतात सरकार ही प्रणाली रोलआउट करत आहे. प्रायोगिक तत्त्वावर आतापर्यंत या पोर्टलद्वारे तब्बल ४ लाख ७९ हजार मोबाइल ट्रॅक केले गेले आहेत. या पोर्टलचा वापर करणे अत्यंत सोपे असून, त्यात मोबाइल संबंधित माहिती भरून आपण आपला चोरी झालेला स्मार्टफोन कुठे आहे? त्याचा गैरवापर तर होत नाही ना, हे अगदी काही मिनिटांत तपासू शकतो. या पोर्टलमध्ये अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

काय आहे संचारसाथी?

भारतात मोबाइल चोरी होण्याच्या, हरवण्याच्या अनेक घटना रोज घडतात. शिवाय चोरी झालेल्या फोनचा गैरवापर होण्याची शक्यताही अधिक असते. हे रोखण्यासाठी सरकार संचारसाथी हे मोबाइलचा शोध लावणारे पोर्टल लॉन्च करत आहे. डॉट इंडियाच्या अधिकृत ट्विटर हॅडलवरून ही माहिती देण्यात आली.

आयएमईआय नंबर बदल्यानंतरही

अनेकदा चोरी झालेल्या मोबाइलचे आयएमईआय नंबर (IMEI) बदलण्यात येतात. यामुळे मोबाइल सापडणे कठीण होते, किंवा परत मिळतच नाही, परंतु हे पोर्टल आयएमईआय नंबर बदलल्यानंतरही डिव्हाइस ट्रॅक आणि ब्लॉक करू शकते.

सिमही करता येणार ब्लॉक

मोबाइल हरवल्यास किंवा चोरी गेल्यास सर्वाधिक धोका असतो तो, त्या सिमचा गैरवापर होण्याचा. मात्र, संचारसाथीच्या माध्यमातून यूजर्स आपला सिम कार्ड नंबरही ॲक्सेस करू शकतात. इतकेच काय तर, अन्य दुसऱ्या कोणत्याही मोबाइलमध्ये सिमचा उपयोग केला जात असेल तर युजर्स सिम ब्लॉकही करू शकतात. याशिवाय जुना किंवा नवीन मोबाइल खरेदी करतानाही युजर्स त्या मोबाइलसंबंधित माहिती या पोर्टलद्वारे मिळवू शकतात.

कर्नाटक पोलिसांची कारवाई

हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या अशा २ हजार ५०० मोबाइल फोनचा कर्नाटक पोलिसांनी या प्रायोगिक तत्वावरील पोर्टलच्या माध्यमातून सुगावा लावला आहे. शिवाय हे सर्व मोबाइल त्या-त्या वापरकर्त्याला परतही केले आहेत.

फोन ब्लॉक, ट्रॅक करण्याची पद्धत

  • https://www.sancharsaathi.gov.in/ या पोर्टलवर जावे

  • ‘ब्लॉक, ट्रॅक युअर फोन’ हा पर्याय निवडा

  • सीईआयआर (CEIR) संकेतस्थळ ओपन होईल

  • त्यावर ब्लॉक, अनब्लॉक फोन हे पर्याय मिळतील

  • यात आवश्यक माहिती भरून युजर्स आपला फोन ब्लॉक, ट्रॅक करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT