twitter and threads sakal
विज्ञान-तंत्र

टेक्नोहंट : नेटकऱ्यांना जोडणारा ‘धागा’

युजर्सना टिवटिव करायला नवा ‘धागा’ मिळाला आहे. मायक्रोब्लॉगिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ट्विटरला स्पर्धक म्हणून ‘मेटा’ने नुकतेच थ्रेड्स अ‍ॅप लाँच केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

- वैभव गाटे

युजर्सना टिवटिव करायला नवा ‘धागा’ मिळाला आहे. मायक्रोब्लॉगिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ट्विटरला स्पर्धक म्हणून ‘मेटा’ने नुकतेच थ्रेड्स अ‍ॅप लाँच केले आहे. त्यामुळे ब्ल्यू टिक गेल्याने नाराज झालेल्या युजर्सना पर्यायी प्लॅटफॉर्म मिळाला आहे. युजर्सना थ्रेड्सवर ट्विटरपेक्षा अधिक शब्दांत व्यक्त होण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. काय आहेत त्याचे फिचर्स, काय आहे त्याची खासियत? जाणून घेऊयात...

फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी ५ जुलै रोजी थ्रेड्स लाँच केले. यानंतर केवळ दोन तासांत ५० लाखांहून अधिक युजर्सनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले, तर आत्तापर्यंत पाच कोटींहून अधिक युजर्सनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. डाउनलोडमध्ये थ्रेड्सने जीपीटी, टिकटॉकलाही मागे टाकले आहे.

काय आहे खासियत?

  • इन्स्टाग्रामच्या टीमने हे अ‍ॅप विकसित केले आहे. भारतासह १०० हून अधिक देशात हे अ‍ॅप लाँच करण्यात आले. टेक्स्ट बेस्ड संवादासाठी असलेले या अ‍ॅपवर युजर्सला फोटो, व्हिडिओही शेअर करता येतील. सध्या अ‍ॅप अँड फ्री आहे; मात्र भविष्यात त्यावर फेसबुक, इन्स्टाग्रामप्रमाणे जाहिराती दिसू शकतील.

‘थ्रेड्स’मध्ये ‘ट्विटर’पेक्षा वेगळं काय?

  • सर्च : ट्विटरवर युजर अकाउंट, हॅशटॅग, शब्दांद्वारे सर्च करू शकतात. थ्रेड्सवर केवळ हॅशटॅग आणि शब्द वापरून सर्च करता येईल.

  • फॉलोअर फीड : ट्विटरवर युजर्स ज्यांना फॉलो करत नाहीत, त्यांचेही ट्विट दिसतात. थ्रेड्सवर युजरला होमपेजवर केवळ त्याच्याच पोस्ट दिसतील, ज्यांना युजर्स फॉलो करत आहेत.

  • ट्विटरवर मिळालेले अपडेट : मागील महिन्यात मिळालेल्या अपडेटमध्ये सामान्य युजरला दररोज केवळ ६०० ट्विट निःशुल्क पाहता येतील. याहून अधिक ट्विट पाहण्यासाठी युजरला पैसे मोजावे लागणार आहेत. ब्ल्यू टिक घेतलेल्या ट्विटर युजरला दररोज ६ हजारहून अधिक पोस्ट पाहता येतात, परंतु त्यांना त्यासाठी वर्षाला ६ हजार ८०० रुपये भरावे लागतील. मात्र, थ्रेड्सवर अद्याप अशा कोणत्याही मर्यादा नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT