Vaio SE14 , Vaio SX14 Google
विज्ञान-तंत्र

Vaio SE14 आणि Vaio SX14 लॅपटॉप भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत

Vaio या जपानी ब्रँडचे Vaio SE14 आणि Vaio SX14 हे दोन लॅपटॉप भारतात लॉन्च करण्यात आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Vaio या जपानी ब्रँडचे Vaio SE14 आणि Vaio SX14 हे दोन लॅपटॉप भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. दोन्ही लॅपटॉपमध्ये 11th जनरेशन इंटेल कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. दोघांमध्ये सुपरफिन टेक्नोलॉजी सपोर्टसह बायो सिक्योरिटी आणि Chassis लॉक स्लॉट सारख्या सुरक्षा फीचर्ससह उपलब्ध असतील. aio SE14 आणि Vaio SX14 ची किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेणार आहोत. (vaio se14 and vaio sx14 laptop launched in india know price specifications)

Vaio SE14 आणि Vaio SX14 लॅपटॉपची किंमत

वायओने Vaio SE14 लॅपटॉपची प्रारंभिक किंमत 88,990 रुपये ठेवली आहे. तर त्याची अपग्रेड वर्जन म्हणजेच Vaio SX14 ची किंमत 1,72,990 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीवर उपलब्ध आहे. हे दोन्ही लॅपटॉप कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अ‍ॅमेझॉन इंडियाकडून खरेदी करता येतील.

Vaio SX14 लॅपटॉप तपशीलचे स्पेसिफिकेशन

Vaio SX14 लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे आणि कीबोर्डमध्ये बॅकलाइट आहे. या लॅपटॉपमध्ये 11th जनरेशनची इंटेल कोर आय 5 आणि चांगल्या परफॉर्मंससाठी 16 जीबी रॅम दिली आहे. या व्यतिरिक्त, लॅपटॉपमध्ये दमदार बॅटरी देण्यात आली असून त एका चार्जवर 12 तासांचा बॅकअप देते.

लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी एचडीएमआय पोर्ट, ब्लूटूथ 5.1, दोन यूएसबी 3.0 पोर्ट, यूएसबी टाइप-सी पोर्ट, दोन थंडरबोल्ट 4 पोर्ट आणि मायक्रो एसडी कार्ड रीडर देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, यात एक आयआर वेबकॅम आणि फिंगरप्रिंट स्कॅनर देखील मिळेल.

Vaio SX14 लॅपटॉप फीचर्स

Vaio SX14 लॅपटॉपमध्ये 14 - इंचाचा डिस्प्ले आहे ज्यात 4 के अल्ट्रा रिजोल्यूशन दिले आहे. या लॅपटॉपमध्ये चांगल्या साऊंडसाठी डॉल्बी ऑडिओ स्पीकर तसेच इंटेल कोर आय 7 प्रोसेसर आहे. याशिवाय लॅपटॉपमध्ये यूएसबी टाइप-सीटीएम पोर्ट, तीन यूएसबी पोर्ट, एचडीएमआय पोर्ट, व्हीजीए कनेक्टर आणि लॅन कनेक्शन मिळतील. बॅटरीबद्दल सांगायचे झाल्यास या लॅपटॉपमध्ये दिलेली बॅटरी एका चार्जवर 7.5 तासांचा बॅकअप देते.

Vaio E15

नवीन वर्षाच्या सुरूवातीस Vaio E15 लॅपटॉप लॉन्च केला आहे. या लॅपटॉपची सुरूवात किंमत 49,990 रुपये आहे. Vaio E15 मध्ये 15.6 इंचाचा फुल एचडी आयपीएस डिस्प्ले आहे जो 1920×1080 पिक्सेलचा स्क्रीन रिझोल्यूशन आणि 16: 9 आस्पेक्ट रेशियोसह येतो. हे लॅपटॉप AMD Ryzen 5 आणि AMD Ryzen 7 मोबाइल प्रोसेसरवर कार्य करते. यात 8 जीबी डीडीआर 4 रॅम आणि 512 जीबी एसएसडी देण्यात आले आहे.

हा लॅपटॉप विंडोज 10 होमसह एमएस ऑफिस 365 वर चालतो आणि बॅकलिट कीबोर्डसह येतो. या लॅपटॉपमध्ये बिल्टइन मायक्रोफोन आणि ड्युअल स्पीकर दिले आहेत. या लॅपटॉपमध्ये वापरलेली बॅटरी 8 तास चालते, असा कंपनीचा दावा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी Vaio E15 मध्ये ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ 4.2, दोन यूएसबी 3.0. पोर्ट, एक टाइप सी पोर्ट आणि मायक्रो एचडीएमआय पोर्ट असे फीचर्स आहेत.

(vaio se14 and vaio sx14 laptop launched in india know price specifications)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT