Vida V1 Pro Electric Scooters : हिरो मोटोकॉर्पने सब ब्रँड विडा अंतर्गत इलेक्ट्रिक स्कूटर व्ही १ प्रो आणि व्ही १ प्लस ला लाँच केले आहे. आता कंपनीच्या दोन इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री होते. ब्रँड ने आता दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत कपात करण्यात करण्याची घोषणा केली आहे.
व्ही १ प्लसची किंमत आता १ लाख १९ हजार ९०० रुपये (एक्स शोरूम) आणि विडा व्ही १ प्रो ची एक्स शोरूम किंमत आता १ लाख ३९ हजार ९०० रुपये आहे. यात पोर्टेबल चार्जर आणि फेम २ सबसिडीची किंमत जोडली आहे.
८ नव्या शहरात विडा व्ही १ ची प्री बुकिंग सुरू
या स्कूटरच्या किंमतीत कपात करण्यात आली असून इलेक्ट्रिक स्कूटरच्या जास्तीत जास्त ग्राहकांना लक्ष्य ठेवण्यासाठी करण्यात आली आहे. देशभरात संबंधित राज्य सबसिडीच्या आधारावर या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत वेगवेगळी असेल. ८ नवीन शहरात विडा व्ही १ ची प्री बुकिंग आधीपासून सुरू करण्यात आली आहे. तसेच याची लवकच डिलिव्हरी सुरू केली जाणार आहे.
दोन्ही ईव्ही रेंज काय आहे
व्ही १ प्रो लाइन अप मध्ये व्ही १ प्लस वर आहे. दोन्ही स्कूटर्सची डिझाइन एक सारखी आहे. दोन्ही ईव्ही रिमूव्हल बॅटरी सोबत येतात. व्ही १ प्लसची बॅटरी क्षमता ३.४४ केडब्ल्यूएच आहे. तर व्ही १ प्रो ची बॅटरी पॅक ३.९४ केडब्लयूएच आहे. याच कारणामुळे विडा व्ही १ प्रोची रायडिंग रेंज १६५ किमीची आहे. तर व्ही १ प्लसची रेंज १४३ किमीची आहे.
मोटर आणि टॉप स्पीड
दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर ६ केडब्ल्यू मोटर सोबत येतात. दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप स्पीड ८० किमी प्रति तास आहे.
१०० शहरात विस्तारासाठी सज्ज
देशभरात विडाचा वेगाने विस्तार करण्यासाठी कंपनी सज्ज आहे. हिरो मोटोकॉर्प च्या विद्यमान नेटवर्क सामर्थ्याचा उपयोग १०० शहरांमध्ये विस्तार करण्याचे कंपनीने ठरवले आहे. आम्हाला खात्री आहे की आमची नवीन किमत अधिक ग्राहकांना ईव्ही स्कूटर श्रेणीमध्ये आणतील आणि त्यांना विडाच्या जागतिक दर्जाच्या चिंतामुक्त ईव्ही इकोसिस्टमचा अनुभव देईल.
आमच्या ग्राहक-केंद्रित तत्त्वांशी प्रामाणिक राहून आम्ही विद्यमान विडा व्ही १ ग्राहकांना नवीन किंमतीचा लाभ देखील देऊ. सार्वजनिक वापरासाठी तीन सुरुवातीच्या शहरांमध्ये ५० ठिकाणी जवळपास ३०० चार्जिंग पॉइंट्स उभारले आहेत . ते लवकरच आपल्या चार्जिंग इकोसिस्टमचा विस्तार नवीन शहरांमध्ये देखील करेल. ग्राहकांच्या सोयीची खात्री करून चार्जिंग नेटवर्क प्रमुख स्थानांवर पसरले जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.