vinayak mete accidentel death : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यांचं निधन झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे त्यांच्या निधनावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. विनायक मेटे यांच्या ज्या गाडीला झालेल्या अपघातामुळे कार सेफ्टी हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हे फोर्ड एंडेव्हर (Ford Endeavour) कारमध्ये प्रवास करत आहेत. ही कार किती सुरक्षित आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ही SUV आंतरराष्ट्रीय बाजारात विकण्यासाठी, Endeavour ला क्रॅश टेस्ट पास कराव्या लागतात. ही कार ऑस्ट्रेलियन NCAP सुरक्षा रेटिंग चाचणीमध्ये, Endeavour ने 5-स्टार रेटिंग मिळविले होते. एन्डेव्हरने 37 गुणांपैकी 35.38 सुरक्षा गुण मिळवले. फोर्ड एंडेव्हरला 64km/ता च्या वेगाने फ्रंटल आणि ऑफसेट क्रॅश झाली आणि 5-स्टार ANCAP रेटिंग मिळवले.
फोर्डची ही SUV शिडीच्या फ्रेमवर बेस्ड आहे, ज्याने फ्रंटल/ऑफसेट क्रॅश चाचणीत 16 पैकी 15.98 गुण मिळवले आहेत. साइड इफेक्ट क्रॅश चाचणीमध्ये, फोर्ड एंडेव्हरने 16 पैकी 16 गुण मिळवले. फोर्ड एंडेव्हर स्टँडर्ड वाहन म्हणून अनेक सुरक्षा फीचर्सनी सुसज्ज आहे. यामध्ये फ्रंट एअरबॅग्ज, साइड कर्टन एअरबॅग्ज, ड्रायव्हर नी एअरबॅग, सीट बेल्ट रिमाइंडर, इमर्जन्सी ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी कंट्रोल (ESC) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) समाविष्ट आहे.
विनायक मेटे हे आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री बीडहून मुंबईला रवाना झाले होते. मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला, या अपघातात मेटे हे जखमी झाले होते, हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे, दरम्यान या अपघातामुळे कारच्या सेफ्टीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.