Vivo Mobile esakal
विज्ञान-तंत्र

Vivo Mobile : आता फक्त 600 रुपयांत मिळणार Vivo T2x 5G, Flipkart वरून करा ऑर्डर

विवो स्मार्टफोनमध्ये तुम्हाला खूप सारे भारी फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

Vivo Mobile : विवो स्मार्टफोनमध्ये तुम्हाला खूप सारे भारी फीचर्स देण्यात आलेत. तसेच, त्याची किंमत देखील खूप कमी आहे. पण आज आपण स्पेसिफिक Vivo T2x 5G बद्दल बोलणार आहोत. जर तुम्ही देखील हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुम्हाला काही गोष्टींची माहिती घ्यावी. तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरणार आहे.

तुम्ही Flipkart वरून Vivo T2x 5G (128GB+6GB RAM) खरेदी करू शकता. या फोनची MRP 18,999 रुपये आहे आणि तुम्ही 26% डिस्काउंटनंतर 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच, यावर तुम्हाला अनेक बँक ऑफर मिळतात. HDFC बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास 1250 रुपयांची सूट मिळू शकते. पण हे लक्षात ठेवा की ही सूट फक्त ईएमआय ट्रान्झॅक्शनवरच दिली जाते.

तुम्हाला एक्सचेंज ऑफरवर वेगळी सूट देखील मिळू शकते. तुम्ही फ्लिपकार्टला जुना स्मार्टफोन परत केल्यास, तुम्हाला त्याऐवजी 13,400 रुपयांची सूट मिळू शकते. पण एवढी बंपर ऑफर मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती चांगली असली पाहिजे आणि ते जुन्या फोनच्या मॉडेलवरही अवलंबून आहे.

तसेच, स्पेसिफिकेशनबाबत तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही. फोनमध्ये 6.58 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय यात ड्युअल रियर कॅमेरा मिळणार आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे.

यासोबतच Vivo T2x मध्ये 5000 mAh बॅटरी देखील उपलब्ध आहे. म्हणजेच, तुम्हाला बॅटरी बॅकअपबद्दल विचार करण्याची गरज नाही. फोनमधील डायमेन्सिटी 6020 प्रोसेसरमुळे स्पीडही मजबूत होत आहे. कमी बजेटचा स्मार्टफोन शोधणाऱ्या युजर्ससाठी हा फोन सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT