Putin's First North Korea Visit in 24 Years: Gifts Kim Jong Un a Luxury Car esakal
विज्ञान-तंत्र

Putin North Korea Visit : पुतिन यांनी किम जोंग उनसाठी चालवलेली कार आहे एकदम जबरदस्त! काय आहेत फिचर्स; जाणून घ्या

पुतिनची आलिशान भेट,किम जोंग उन यांना रशियाची 'ऑरस सिनेट'

Saisimran Ghashi

Luxury Car Gift : एखाद्याला भेटवस्तू देणे हे मैत्री व्यक्त करण्याचा एक चांगला मार्ग मानला जातो. विविध देशांमध्ये जागतिक पातळीवर अश्या प्रकारची देवाणघेवाण सुरूच असते. 24 वर्षात पहिल्यांदाच उत्तर कोरियाला दिलेल्या भेटीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही असेच काहीसे केले आहे. पुतीन बुधवारी पहाटे उत्तर कोरियाला पोहोचले जेथे उत्तर कोरियाचे प्रमुख नेते किम जोंग उन यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी एकमेकांना मौल्यवान भेटवस्तूही दिल्या, ज्यामध्ये व्लादिमीर पुतिन यांच्या भेटवस्तूची जोरदार चर्चा होत आहे.

जागतिक मीडिया रिपोर्ट्सनुसार व्लादिमीर पुतिन यांनी किम जोंग उन यांना ऑरस सिनेट लक्झरी कार भेट दिली आहे.पुतिन यांनी ही आलिशान कार केवळ गिफ्ट म्हणून दिली नाही तर त्यांनी किम जोंग उन यांना या कारमध्ये फिरायलाही नेले. यादरम्यान पुतिन यांनी स्वतः कार चालवली आणि किम जोंग त्यांच्या शेजारी को-ड्रायव्हिंग सीटवर बसलेले दिसले.त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

आघाडीच्या नेत्यांच्या या लक्झरी राईडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही लक्झरी कार कशी आहे? याची एवढी चर्चा का होत आहे जाणून घेऊया.

ही कार रशियाच्या आघाडीच्या कार उत्पादक ऑरस मोटर्सने सेंट्रल सायंटिफिक रिसर्च ऑटोमोबाईल आणि ऑटोमोटिव्ह इंजिन इन्स्टिट्यूट (NAMI) यांच्या सहकार्याने विकसित केली आहे. रशियाची रोल्स रॉयस म्हणून ओळखली जाणारी ही कार पूर्ण आकाराची लक्झरी लिमोझिन आहे, ज्याचा फ्रंट लुक आणि ग्रिलची रचना प्रसिद्ध रोल्स-रॉयस कारसारखीच आहे.

फेब्रुवारीमध्येही पुतिन यांनी किम यांना ऑरस लिमोझिन कार भेट दिली होती, त्यामुळे आता किमकडे अशा दोन आलिशान कार आहेत. या कारमध्ये 4.4-लिटर क्षमतेचे ट्विन टर्बो V8 इंजिन आहे, जे 590bhp पॉवर जनरेट करते. साध्या भाषेत सांगायचे तर, त्याचे पॉवर आउटपुट भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनरपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. विशेष म्हणजे, जर्मन कार कंपनी पोर्शनेही ही कार विकसित करण्यात मदत केली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव या लक्झरी कारची सर्व वैशिष्ट्ये सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत, परंतु गोळीबार व बॉम्बस्फोट सहन करण्याची क्षमता आहे. Advanced Driving Assistance System (ADAS), आपत्कालीन ब्रेकिंग सिस्टम, आपत्कालीन कॉल सपोर्ट, 8 मोडसह बॅक एलईडी लाइटिंग, वायरलेस फोन चार्जर यांसारख्या आधुनिक सुविधांनी युक्त ही कार अत्यंत सुरक्षित आणि आरामदायी आहे.

ही भेट पुतिन आणि किम यांच्यातील दृढ मैत्री आणि सहयोगाचे प्रतीक असून, जागतिक स्तरावर या भेटीमुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT