vlc media player banned in india website and vlc download link blocked check details  
विज्ञान-तंत्र

VLC मीडिया प्लेअरवर डिजिटल स्ट्राईक; भारतात घातली बंदी

सकाळ डिजिटल टीम

VLC Media Player Ban : मीडिया प्लेयर सॉफ्टवेअर आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हर व्हीएलसी मीडिया प्लेयरवर बंदी घालण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार व्हीएलसी मीडिया प्लेयर आणि व्हिडिओलॅन (VideoLAN) प्रोजेक्टच्या वेबसाइटवर आयटी कायदा, 2000 अंतर्गत सरकारने बंदी घातली आहे. व्हीएलसी मीडिया प्लेयर आणि त्याच्या वेबसाइटची सेवा सुमारे दोन महिने आधीच बंद करण्यात आली आहे. या प्रकरणी कंपनी आणि सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. व्हीएलसी मीडियाची वेबसाईट ओपन केल्यावर आय अॅक्ट अंतर्गत बॅन केल्याचा मेसेज दिसतो.

काही दिवसांपूर्वी BGMI वर बंदी

याआधीही सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव जवळपास 350 चायनीज अॅप्स भारतात बॅन केले होते. अलीकडे, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) देखील Google Play Store आणि Apple च्या अॅपवरून अचानक गायब झाले. यानंतर, स्टोअरमधून बीजीएमआय गायब झाल्यामुळे गेम खेळाडू नाराज झाले आणि ट्विटरवर बीजीएमआय हॅशटॅग देखील ट्रेंड झाला. BGMI बंदीची नंतर एका वृत्तसंस्थेने याबद्दल बातमी दिली होती. 2020 मध्ये PUBG वर बंदी घातल्यानंतर BGMI हा PUBG मोबाईल गेमचा नवीन अवतार म्हणून लॉन्च करण्यात आले होते.

या बंदीबाबत कंपनी आणि सरकारकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. एका ट्विटर युजरने ट्विट करून ही माहिती दिली आणि सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर दोन महिन्यांपूर्वी बंदी घालण्यात आली आहे, युजरने लिहिले की, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानुसार हे प्लॅटफॉर्म आयटी कायदा, 2000 अंतर्गत भारतात बंद करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates : राजनाथ सिंह यांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल सशस्त्र दल आणि उद्योगाचे अभिनंदन केले

Uric Acid Home Remedies: युरिक अ‍ॅसिडची समस्या असल्यास सकाळी रिकाम्यापोटी 'ही' गोष्ट पाण्यात उकळून प्यावी, मिळेल आराम

Hasan Mushrif : 'ED प्रकरणात कोर्टानं मला क्लीन चिट दिलीये, शरद पवारांना याची माहिती नाही'; काय म्हणाले मुश्रीफ?

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT