Vodafone Idea News Updates sakal news
विज्ञान-तंत्र

Vi चा 599 चा प्रीपेड प्लॅन, देतोय Jio-Airtel पेक्षा भारी बेनिफिट्स

सकाळ डिजिटल टीम

Vi 599 Rupees Prepaid Plan : वोडाफोन आयडीयाने (Vi) आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी 599 रुपयांचा एक बेस्ट प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे याची वैधता 70 दिवसांची असून प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएससह दररोज 1.5GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये Vi Hero Unlimited बेनिफिट्सचा देखील समावेश आहे ज्यात डेटा डिलाईट्स, वीकेंड रोलओव्हर आणि बिंज ऑल नाईट ऑफर दिल्या जातात, हा प्लॅन Jio आणि Airtel च्या 84 दिवसांच्या प्लॅन पेक्षा कितीतरी बाबतीत बेस्ट आहे.

Jio चा 666 आणि Airtel चा 719 रुपयांच्या 84-दिवसांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला Vi च्या 599 रुपयांच्या प्लॅनपेक्षा तुम्हाला 14 दिवसांची जास्त व्हॅलिडीटी मिळते. पण डेटाच्या बाबतीत, Vi च्या या प्लॅनसमोर Jio आणि Airtel चे प्लॅन कमी पडताना दिसतात. याचे कारण म्हणजे Vi आपल्या या प्लॅनसह ग्राहकांना अनेक अतिरिक्त ऑफर देते. या प्लॅनमध्ये Vi Hero Unlimited बेनिफिट्स देखील मिळतात, ज्यात डेटा डिलाइट्स, वीकेंड रोलओव्हर आणि बिंज ऑल नाईट ऑफर यांचा समावेश आहे. Vi च्या 84 दिवसांच्या प्लॅनमध्ये 1.5GB डेली डेटासाठी 719 रुपये खर्च येतो, तर 70 दिवसांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना खूप चांगले फायदे मिळत आहेत.

1. वीकेंड डेटा रोलओव्हर: Vi आपल्या वापरकर्त्यांना वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा देते, यामध्ये ग्राहकांना आठवड्यातील उर्वरित डेटा शनिवार आणि रविवारी वापरण्याची सुविधा मिळते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या पॅकमध्ये दररोज 1.5 GB डेटा मिळत असेल, परंतु तुम्ही दररोज फक्त 1 GB डेटा वापरत असाल. त्यामुळे सोमवार ते शुक्रवारपर्यंत एकूण 2.5 जीबी डेटा जमा होणार आहे. जे तुम्ही वीकेंडला वापरू शकता.

2. Binge All Night: Binge All Night सुविधेअंतर्गत, ग्राहकांना रात्री अमर्यादित डेटा वापरण्याची सुविधा मिळते. रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत तुम्हाला हवे तेवढे इंटरनेट वापरू शकता. विशेष म्हणजे हा डेटा तुमच्या रोजच्या पॅकमधून कापला जाणार नाही.

3. डेटा डिलाइट्स: डेटा डिलाइट अंतर्गत, वापरकर्त्यांना दरमहा 2 GB चा अतिरिक्त आपत्कालीन डेटा दिला जातो. हे एक फ्री फीचर आहे, जे वापरकर्त्यांना एक्टिवेट करावे लागेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना Vi अॅपमध्ये लॉग इन करावे लागेल किंवा 121249 डायल करावे लागेल.

दिवसाता खर्च फक्त 8.56 रुपये

599 च्या प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV Classic चे ओव्हर-द-टॉप (OTT) फायदे देखील मिळत आहेत. जर तुम्हाला कमी किंमतीत मध्यम-मुदतीसाठी प्रीपेड प्लॅन हवा असेल, तर Vodafone Idea चा हा 599 रुपयांचा प्लॅन हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्ही Vi चा 599 रुपयांचा प्लॅन घेतला, तर तुम्हाला मोबाईल सेवांसाठी दररोज फक्त 8.56 रुपये खर्च करावे लागतात. यामध्ये 1.5GB डेली डेटा आणि इतर अतिरिक्त ऑफर देखील देण्यात येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

US Election : अमेरिकेला मिळणार पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष? कमला हॅरिस यांच्या गावी विजयाची उत्कंठा

SCROLL FOR NEXT