Vi Cheapest Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) प्रतिस्पर्धी कंपन्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलला टक्कर देण्यासाठी सातत्याने नवनवीन ऑफरची घोषणा करत असते. कंपनीकडे कमी किंमतीत जबरदस्त बेनिफिट्ससह येणारे अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनीच्या प्लॅन्समध्ये डेटा, कॉलिंगसह ओटीटी सबस्क्रिप्शन देत आहे. अनेक कंपन्या Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहेत. परंतु, तुम्ही Vi च्या ग्राहक असल्यास SonyLIV चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
Vodafone Idea च्या अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये SonyLIV चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. SonyLIV सबस्क्रिप्शनसह येणाऱ्या वीआयच्या अशाच दोन प्लॅन्सविषयी जाणून घेऊया.
SonyLIV सबस्क्रिप्शनसह येणाऱ्या वीआयच्या या प्लॅन्सची किंमत ८२ रुपये आणि ६९८ रुपये आङे. दोन्ही प्लॅन्समध्ये तुम्हाला सोनीलिव्हच्या मोफत सबस्क्रिप्शनसह अनेक बेनिफिट्सचा फायदा मिळेल.
हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून
Vodafone Idea चा ८२ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Vodafone Idea कडे अवघ्या ८२ रुपये किंमतीचा शानदार सबस्क्रिप्शन प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला SonyLIV चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय, ४ जीबी डेटा देखील दिला जातो. या प्लॅनची वैधता १४ दिवस आहे. मात्र, लक्षात घ्या की प्लॅनमध्ये मिळणाऱ्या डेटाची वैधता १४ दिवस आहे. परंतु, SonyLIV Mobile सबस्क्रिप्शनचा फायदा तुम्ही २८ दिवस घेऊ शकता.
Vodafone Idea चा ६९८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Vodafone Idea कडे SonyLIV Mobile च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येणारा ६९८ रुपयांचा प्लॅन देखील उपलब्ध आहे. कंपनीच्या या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. प्लॅनमध्ये एकूण १० जीबी डेटा दिला जातो. लक्षात घ्या की, या रिचार्जवर तुम्हाला संपूर्ण १ वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. म्हणजेच, SonyLIV वरील चित्रपट, सीरिज पाहण्यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.