auroVolkswagen Electric SUV ID.4 GTX : फोक्सवेगन कंपनी पुढील वर्षी इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. या कारमध्ये शानदार लूक आणि पॉवरफुल फीचर्स मिळणार आहेत. फोक्सवेगनने गेल्या काही दिवसात इंडियन मार्केटमध्ये आपली टायगुन एसयूव्ही आणि व्हर्चूस सेडानचे नवीन व्हेरियंट आणि कलर ऑप्शन आणले आहेत. जे ग्राहकांसाठी ट्रिटप्रमाणे आहेत.
नुकतेच फोक्सवेगन इंडिया वार्षिक ब्रँड काँफ्रेन्स २०२३ मध्ये कंपनीने आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही फोक्सवेगन आयडी ४ जीटीएक्सला आणले आहे. जे दिसायला शानदार आहेत. सध्या ही इलेक्ट्रिक एसयूव्ही अमेरिका, ब्रिटन आणि यूरोपिय देशात विक्री केली जात आहे. या कारला महिन्यात इंडियन रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान पाहिले गेले आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की, पुढील वर्षी भारतात या कारला लाँच केले जाणार आहे.
पुढील वर्षी होणार लाँच
जर्मन कार मेकर फोक्सवेगनने पहिल्यांदा ऑटो एक्सपो २०२० मध्ये ID.4 GTX ला अनवील केले होते. या ऑल इलेक्ट्रिक एसयूव्हीची लोकांना खूप उत्सूकता आहे. ३ वर्षात इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये खूप बदल करण्यात आला आहे. या ठिकाणी खूप कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. हे पाहून फोक्सवेगन आगामी दिवसात इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी करीत आहे. आयडी ४ जीटी एक्सला कंपनीने MEB बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केले आहे.
फ्यूचरिस्टिक डिझाइनची एसयूव्ही
स्लिक आणि फ्यूचरिस्टिक डिझाइनची Volkswagen ID.4 GTX मध्ये ऑल एलईडी हेडलँम्प्स आणि टेललँम्प्स सोबत जीटीएक्सची बॅजिंग पाहायला मिळेल. यात क्लोज्ड फ्रंट ग्रिल, साइड फ्रंट फेंडर, २० इंचाचा अलॉय व्हील्ज सारखी खास फीचर्स सोबत फुल टीएफटी इंस्ट्रूमेंट क्लस्टर, स्टीयरिंग व्हील, पॅनोरमिक सनरूफ, मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि पॉवर्ड स्टीयरिंग व्हील पाहायला मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.