महाराष्ट्रभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूरातील अनेक धरणे भरले आहेत. यामुळे धरणातून विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना सतर्कतेचा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून क्युसेक, टीएमसी, विसर्ग हे शब्द आपल्या कानावर पडत आहेत. परंतु याचा नेमका अर्थ काय? हे खूप लोकांना माहित नाही. धरणसाठा भरल्यानंतर तीव्रतेने टक्केवारी आपल्या लक्षात राहते. मात्र आता क्युसेक, टीएमसी, विसर्ग म्हणजे काय, हे सोप्या शब्दात समजून घेऊ.
क्युसेक हा शब्द 'क्युबिक फीट पर सेकंड' (Cubic Feet per Second) या एककाचा संक्षिप्त रूप आहे. हे धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे मापन करते. १ क्युसेक म्हणजे दर सेकंदाला एक घनफुट पाणी. धरणातून किती प्रमाणात पाणी बाहेर सोडले जात आहे हे क्युसेकच्या माध्यमातून मोजले जाते.
टीएमसी हा 'थाऊसंड मिलियन क्युबिक फीट' (Thousand Million Cubic Feet) या एककाचा संक्षिप्त रूप आहे. धरणातील पाण्याचे साठा मोजण्यासाठी हे वापरले जाते. १ टीएमसी म्हणजे १००० दशलक्ष घनफूट पाणी. म्हणजेच, हे धरणात साठलेल्या पाण्याचे एकक आहे जे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा मोजण्यासाठी वापरले जाते.
विसर्ग म्हणजे धरणातून बाहेर सोडले जाणारे पाणी. पाऊस पडल्यावर धरणे भरल्यामुळे पाणी बाहेर सोडावे लागते, त्यालाच विसर्ग म्हणतात. हा विसर्ग क्युसेक किंवा टीएमसीमध्ये मोजला जातो. विसर्गामुळे नद्यांना पूर येऊ शकतो आणि त्यामुळे आसपासच्या भागात पूरपरिस्थिती निर्माण होते.
धरणातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाण्याचा साठा मोजणे आणि नियोजन करणे हे क्युसेक आणि टीएमसीच्या माध्यमातून केले जाते. धरणातून बाहेर सोडले जाणारे पाणी म्हणजेच विसर्ग हा नियंत्रित असणे आवश्यक आहे, अन्यथा पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते.
क्युसेक, टीएमसी, आणि विसर्ग या संज्ञांचा अर्थ आणि त्यांचे महत्त्व समजून घेतल्याने आपण पाण्याचे व्यवस्थापन कसे केले जाते हे समजू शकतो. या तिन्ही एककांच्या माध्यमातून धरणातील पाण्याचे साठा, प्रवाह, आणि विसर्गाचे नियोजन करणे सोपे होते. त्यामुळे पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाला या मापदंडांचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.