Lensa AI App Features: आज स्मार्टफोनमध्ये प्रत्येक कामासाठी एक वेगळे अॅप उपलब्ध असते. खासकरून, फोनमध्ये फोटोग्राफीसाठी असलेले २-४ अॅप्स प्रत्येकाच्या फोनमध्ये पाहायला मिळतातच. सोशल मीडियावर चांगले फोटो पोस्ट करण्यासाठी अशा एडिटिंग अॅप्सची गरज पडतेच. असेच एक हटके अॅप सध्या चर्चेत आहे. या अॅपचे नाव Lensa AI आहे. विशेष म्हणजे या अॅपची भुरळ कलाकारांना देखील पडली आहे.
Lensa AI च्या माध्यमातून तुम्ही तुमचे फोटो अगदी क्रिएटिव्ह पद्धतीने एडिट करू शकता. तुम्हाला केवळ तुमचे फोटो अपलोड करावे लागतील व त्यानंतरचे सर्व काम AI करते. Lensa AI तुमचे फोटो आकर्षक बॅकग्राउंड, पेटिंगमध्ये बदलून टाकेल. विशेष म्हणजे हे अॅप तुमच्या फोटोला हटके लूक देते. Lensa AI विषयी सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये
Lensa AI कसे काम करते?
Lensa AI अॅपने अनेकांना वेड लावले आहे. या अॅपला तुम्ही अॅपल अॅप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरवरून सहज डाउनलोड करू शकता. तुम्हाला अॅपमध्ये तुमचे काही फोटो अपलोड करावे लागतील. त्यानंतर एआय वेगवेगळ्या अवतारात तुमचे फोटो जनरेट करेल. तुमचा फोटो कशाप्रकारे जनरेट व्हावा याचे काही पर्याय देखील तुम्हाला मिळतील. येथे fairy princess, focus, pop, stylish असे १० पर्याय तुम्हाला मिळतील.
तुम्ही अपलोड केलेले फोटो जनरेट होण्यासाठी काही मिनिटं लागू शकतात. मात्र, जनरेट झालेले फोटो पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही शॉर्ट व्हीडिओ देखील रेकॉर्ड करू शकता. या अॅपची मालकी Prisma Labs कडे आहे. Prisma Labs देखील काही महिन्यांपूर्वी हटके फीचर्समुळे चर्चेत आले होते.
Lensa AI साठी किती पैसे मोजावे लागतील?
Lensa AI अॅपला तुम्ही अॅपल अॅप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरवरून सहज डाउनलोड करू शकता. या अॅपचे ७ दिवसांचे फ्री ट्रायल वापरू शकता. मात्र, इतर फीचर्स वापरण्यासाठी तुम्हाला वर्षाला २,४९९ रुपये खर्च करावे लागतील.
अॅप किती सुरक्षित?
Lensa AI हे अमेरिकेत सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेले फोटोग्राफी अॅप आहे. तर भारतात हे सहाव्या क्रमांकावर आहे. मात्र, अॅपच्या लोकप्रियतेसोबतच यूजर्स प्रायव्हसीबाबत देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. या अॅपने फोटोंना आक्षेपार्ह अवतारात बदलल्याची तक्रार काही महिला यूजर्सकडून करण्यात आली आहे. अॅपद्वारे खासगी माहितीचा चुकीच्या कामासाठी वापर केला जाऊ शकतो, अशीही शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. मात्र, Lensa AI ने स्पष्ट केले आहे की अवतार जनरेट झाल्यानंतर अपलोड केलेले फोटो आपोआप डिलीट होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.