what is mastodon social media platform mastodon Twitter alternative marathi tech news  
विज्ञान-तंत्र

Mastodon : ट्विटरचा कंटाळा आलाय ? पर्याय म्हणून आलाय 'मास्टोडॉन', काय आहे कॉन्सेप्ट

सकाळ डिजिटल टीम

इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर ट्विटर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दररोज चर्चेत आहे. कधी ब्लू टिक चार्ज, कधी मस्कचे ट्विट तर कधी कर्मचाऱ्यांना काढून टाकलं यावरून ट्विटरवर दररोज चर्चा होत आहेत. दरम्यान, मोठ्या संख्येने वापरकर्ते इतर प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. भारतात कू (Koo) हा एक पर्याय उपलब्ध आहे. यासोबतच जगात इतरही अनेक पर्याय आहेत. यापैकी एक आहे - मास्टोडॉन.

मास्टोडॉन (Mastodon) हेच नाव का बरं?

मास्टोडॉन हे नाव प्राचीन हत्तीशी संबंधित आहे. मोठे दात असलेला हत्ती, जे हजारो वर्षांपूर्वी नामशेष झाला होता. हे आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका आणि मध्य अमेरिकेत आढळून येत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला हत्तीच्या या प्रजातींवरून नाव देण्यात आले आहे.

या प्लॅटफॉर्मवर देखील तुमचे विचार शेअर करता येतात. ट्विटरवर आपण ट्विट करतो, तर मास्टोडॉनवर मात्र याला टूट (Toot) असे म्हणातात. या प्लॅटफॉर्मची खास बाब म्हणजे याचा मालक इलॉन मस्क सारखा एकल व्यक्ती किंवा कंपनी नाही. त्याची मालकी ही वेगवेगळ्या लोकांकडे किंवा संस्थांकडे असते. त्यामुळे सर्व्हरच्या मालकाने ते बंद केले तर तुमचे खातेही बंद होऊ शकते. जरी आपण सर्व्हर देखील बदलू शकता.

२००६ साली जॅक डॉर्सीने ट्विटर सुरू केलं आणि त्यानंतर १० वर्षांनी २०१६ साली जर्मनीमध्ये युजेन रॉचको (Eugen Rochko) या तरुणाने मास्टोडॉन सुरू केलं. या दोनी प्लॅटफॉर्मवर विचारांची देवणघेवाण होते, पण यामध्ये मुलभूत फरक आहे.

ट्विटरचे संचालक हे वापरकर्तांसाठू नियम ठरवतात, प्लॅटफॉर्मवर तुम्ही काय लिहू शकता काय शेअर करू शकता याबद्दल देखील नियम त्यांच्याकडूनच केले जातात. मास्टोडॉन या प्लॅटफॉर्मवर मॉडेल याच्यापेक्षा पुर्णपणे उलट आहे.

यामध्ये काय खास आहे?

मास्टोडॉन या ओपन-सोर्स सॉफ्टवेअरवर कुणीही स्वतःचं सोशल मीडिया सर्व्हर सुरू करू शकतं आणि स्वतःचे नियम ठरवू शकतं. असे अनेक सर्व्हर हे एकमेकांना जोडलेले असतात. तुम्ही मॅस्टडॉनच्या तुमच्या आवडीनुसार कोणत्याही सर्व्हरवर अकाउंट काढू शकता. तुमच्या पेशानुसार, देशानुसार, आवडींनुसार तुम्ही कुठलंही सर्व्हर जॉईन करू शकता.

प्रत्येक सर्व्हरचे वेगळे नियम असतात. या नियमांचं पालन झालं नाही तर तुमच्यावर करावाई होऊ शकते. मास्टोडॉनची एक खास गोष्ट म्हणजे ते मोफत वापरता येते. तसेच काही ठराविक परिस्थितींमध्ये या प्लॅटफॉर्मवर तुमच्याकडून डोनेशन देखील मागितले जाते. याला ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणतात.

मास्टोडॉनचे सर्व सर्व्हर क्राउडफंडिंगने चालतात. म्हणजे मास्टोडॉन वर्गणी आणि देणग्यांवर चालतं. इथे कुणी मालक नाही आणि याचा एक चालक देखील नाही. मास्टोडॉनला कुणी विकत घेऊ शकत नाही. कुणी नफा कमवत नाही. सरकार एका झटक्यात बंदी घालू शकत नाही.

मस्कने ट्विटर खरेदी केल्यापासून, मास्टोडॉनवरील वापरकर्ते खूप वेगाने वाढत आहेत. हा प्लॅटफॉर्म अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे आणि अलीकडच्या काळात त्याचे वापरकर्ते लाखांमध्ये वाढत आहेत. लोकांमध्ये या प्लॅटफॉर्मबद्दल इंटरेस्ट वाढताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT