Pig Butchering Scam eSakal
विज्ञान-तंत्र

Pig Butchering Scam : भारतातही पसरतोय चीनमधील 'पिग बुचरिंग' स्कॅम; शेअर मार्केट गुंतवणुकदारांना गंभीर इशारा!

Nitin Kamath Alert : ऑनलाईन ब्रोकरेज फर्म झेरोधाचे फाऊंडर नितीन कामथ यांनी याबाबत इशारा दिला आहे.

Sudesh

Share Market Pig Butchering Scam : सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात स्कॅम्स होत आहेत. स्कॅमर्स नवनवीन प्रकारांनी लोकांना गंडवत आहेत. अशातच एका नवीन प्रकारचा स्कॅम भारतात वाढत चालला आहे 'पिग बुचरिंग' असं या स्कॅमचं नाव आहे. याचा उगम चीनमध्ये झाला होता. ऑनलाईन ब्रोकरेज फर्म झेरोधाचे फाऊंडर नितीन कामथ यांनी याबाबत इशारा दिला आहे.

कामथ यांनी सांगितलं, की स्कॅमर्स भारतीय ब्रोकरेज फर्मसारख्या दिसणाऱ्या वेबसाईट्स तयार करत आहेत. या वेबसाईट्स फिशिंगसाठी तयार केल्या जातात. ज्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केली जाते. चिनी लोन अ‍ॅप्सनंतर आता चीन आणि अन्य आशियाई देशांमधील हा पिग बुचरिंग स्कॅम भारतात फोफावत आहे.

कसं करतं काम?

कित्येक देशांमध्ये पिग, म्हणजेच डुकराचं मांस आवडीने खाल्लं जातं. जेव्हा मांस मिळण्यासाठी म्हणून डुकरांना पाळलं जातं, तेव्हा त्यांना खाऊ-पिऊ घालून आधी मोठं करतात. जेणेकरून भरपूर मांस मिळेल. अशाच प्रकारे या स्कॅममध्ये स्कॅमर्स आपल्या टार्गेटला मोठी रक्कम जिंकण्याचं आमिष देतात. (What is Pig Butchering Scam)

सुरुवातीला या टार्गेटला काही रक्कम जिंकू दिली जाते. रक्कम जिंकत गेल्यामुळे व्यक्तीचा हॅकर्सवर विश्वास बसतो, आणि ते मोठी रक्कम गुंतवतात. यानंतर हॅकर्स कोणताही ट्रेस न ठेवता गायब होतात, आणि मग या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचं कळतं.

असा करा बचाव

या स्कॅमपासून बचावाचा उपाय म्हणजे अनोळखी मेसेजना रिप्लाय न करणे, आणि आमिष दाखवणाऱ्या लिंक्सवर क्लिक न करणे. याव्यतिरिक्त प्ले-स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअर व्यतिरिक्त अन्य सोर्सवरुन कोणतंही ट्रेडिंग अ‍ॅप डाऊनलोड न करणे. क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत देखील अशा प्रकारचे स्कॅम होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

CNG Price Hike: महागाईचा झटका! गॅस कंपनीकडून सीएनजीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत नवीन दर?

निकालानंतर मविआ की महायुती? वंचित कुणाशी युती करणार? प्रकाश आंबेडकरांनी ट्विटमधून सगळंच सांगितलं!

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Whatsapp Voice Note Transcription Feature : व्हॉट्सॲपवर जबरदस्त फीचरची एंट्री, पटकन बघून घ्या

SCROLL FOR NEXT