पुणे: आज काल सर्वांना एक मस्त आणि सुंदर दिसणारी आपली स्वतःची कार हवी असते. काळानुसार लोकांच्या गरजा बदलल्या आहेत आणि तसेच आपल्या गाडी मध्ये काय काय असावे याचे गणितही बदलले आहे. कम्फर्ट, दिसायला छान, ताकद, अशा अनेक गोष्टींवर गडू घेण्याचा ग्राहकाचा निर्णय ठरत असत आता या यादीत 'सनरूफ'चा देखील समावेश झाला आहे. ७ लाखांहून अधिक किंमत असलेली गाडी घ्यायची म्हटले कि सनरूफ तर ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. सध्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या आपल्या गाड्यांमध्ये भरभरून फीचर्स देत आहेत आणि त्यात सनरूफ हे एक अत्यंत महत्वाचे फिचर आहे. पण या सनरूफ चे अनेक फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊयात याच अतिशय महत्वाच्या फिचर बद्दल काही गोष्टी.
सनरूफचे फायदे :
१) गाडीत ताजी हवा खेळती राहावी यासाठी उपयुक्त
सनरूफचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गाडीत भरपूर उजेड त्यामुळे येतो. त्याला असलेल्या टिंटेड काचेमुळे खूप जास्त ऊन देखील आत येत नाही. सर्वात मोठा फायदा असा कि बाहेरची ताजी हवा गाडीत खेळत राहते आणि त्याने प्रवाशांना गाडीत देशील हवेशीर असल्याचा छान अनुभव मिळतो आणि कम्फर्ट देखील सनरूफमुळे मिळतो.
२) गाडीतील उष्णता बाहेर पाडण्यासाठी
आपला देश एक उष्ण वातावरण असलेला देश मानला जातो. खूप वेळ गाडी पार्किंग मध्ये लावल्यांनंतर गाडी अतिशय गरम होते आणि अशात गाडीत बसल्यास त्रास होऊ शकतो . गाडी इतकी गरम होते कि एखाद्या भट्टीत बसल्यासारखे प्रवाशांना वाटते. अशा गरम गाडीत बसून फुल्ल स्पीड वर एसी लावणे देशील तब्येतीसाठी धोकादायक असते. याउलट गाडीत बसण्याआधी सनरूफ थोडे उघडल्यास गाडीतील गरम हवा बाहेर पडते. गरम हवा ही गार हवेपेक्षा हलकी असल्याने सनरूफमधून ती पटकन बाहेर पडते.
३) एक सुखद आणि आनंदी प्रवास
मध्यम वेगाने गाडी चालवत असताना सनरूफ थोडे उघडल्यास येणाऱ्या छान हवेने सुखद आणि आनंदी प्रवास अनुभवायला मिळतो. रात्रीच्या वेळेस सनरूफ उघडे ठेवल्यास एसी लावण्याची देखील अनेक वेळा गरज भासत नाही. खिडकी उघडल्याने कानावर येणारे वारे अनेकांसाठी त्रासदायक ठरते पण खिडकी बंद ठेऊन फक्त सनरूफ उघडे ठेवल्यास कानावर थेट वारे येण्याचा प्रश्नच राहात नाही.
४) गाडीला मिळतो उत्तम लूक
प्रत्येकाला आपली गाडी मस्त आणि देखणी असावी असे वाटते आणि गाडी विकत घेण्यासाठी हा देखील एक महत्वाचा घटक असतो. सनरूफमुळे गाडीला एक क्लासी लूक मिळतो तसेच सनरूफवर असलेल्या टिंटेड ग्लासमुळे देखील गाडीच्या लूकमध्ये भर पडते.
सनरूफ हे एक उत्तम आणि प्रीमियम फिचर असले तरीही ते वापरण्याचे देखील काही नियम आहेत आणि ते न पाळल्यास सनरूफ धोकादायक ठरू शकते. सनरूफचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत अर्थात हे तोटे सनरूफचा चुकीचा वापर केल्याने होऊ शकतात. मग काय करू नये ते पाहुयात.
सनरूफ - काय करू नये
१) सनरूफमधून बाहेर येणे किंवा डोकावणे
गाडी मधून प्रवास करत असताना सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे प्रवाशांचा सुरक्षेचा. गाडीतून प्रवास करताना सीटवर बसून सीटबेल्ट लावणे अतिशय महत्वाचे असते. पण अनेकवेळा लोक सनरूफमधून हाथ बाहेर काढताना दिसतात किंवा सनरूफमधून उभे राहतात तसेच अनेक वेळा लहानमुले देखील असे करताना पाहायला मिळतात पण याकडे पालकांनी लक्ष देऊ त्यांना रोखणे गरजेचे आहे. सनरूफमध्ये उभे असताना जोरात ब्रेक मारल्यास छाती, बरगड्या आणि मणक्याला मोठी इजा होऊ शकते. गाडी जरी हळू असेल म्हणजेच अगदी १५ किमी प्रति तास इतका कमी वेग असला तरीही मोठी इजा होऊ शकते. जोरात ब्रेक मारल्यास सनरूफमध्ये उभा असणारा प्रवासी बाहेर देखील फेकला जाण्याची शक्यता असते. पतंगाच्या मांजाने गळ्याला इजा होऊन अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत.
तात्पर्य इतकेच की सनरूफ प्रवाशांनी उभे राहण्यासाठी नसते तर हवा खेळती राहण्यासाठी असते.
२) गाडीला सनरूफ नसताना बाहेरून ते बसवून घेणे
सनरूफ हे कितीही आकर्षक वाटत असले तरीही ते कंपनी कडून आले असेल तरच चांगले कारण कंपन्यांमध्ये फीचर्स देण्याआधी त्याची पूर्ण चाचणी होते आणि गाडीच्या स्ट्रक्चरला कुठे धोका होणार नाही याची काळजी घेतली जाते. बाहेरून सनरूफ बसवून घेणे धोकादायक ठरू शकते कारण मुळात तुमच्या गाडीच्या रचनेत ते नसते. गाडीची फ्रेम कट करून ते बसवावे लागते आणि त्याने गाडीच्या मूळ रचनेला हानी होते. असे केल्यास सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थति होत . बाहेरून बसवून घेतलेल्या सनरूफमधून पाणी गळती देखील होऊ शकते आणि त्याने गाडीच्या वायरिंग मध्ये देखील बिघाड होऊ शकतो.
प्रत्येक फिचर हे सुविधा आणि आरामदायक प्रवास व्हावा यासाठी देण्यात येते पण त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे अतिशय महत्वाचे असते. चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास सुरक्षेचा प्रश्न उद्भवतो तसेच जीवावर देखील बेतू शकते. त्यामुळे सनरूफ योग्य पद्धतीने वापर आणि मस्त ,आनंददायी , आरामदायक प्रवासाचा अनुभव घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.