WhatsApp ने भारतामध्ये जानेवारी माहिन्यामध्ये लाखो अकाऊंट्स बॅन केले. नव्या रिपोर्टनुसार WhatsApp ने जानेवारीमध्ये १८ लाख पेक्षा जास्त लोकांचे अकाऊंटस् बॅन केले आहे. या अकाऊंटला १ जानेवारी २०२२ पासून ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बॅन केले गेले आहे.
Meta मालकी असलेल्या मेसजिंग प्लॅटफॉर्मबाबतचा रिपोर्ट प्रत्येक महिन्याला रिपोर्ट जाहीर करतो. या अकाऊंट्सवर WhatsApp कंपनीच्या नियमांना मान न केल्यास बॅन केले जाते म्हणजेच जे अकाऊंट कपनीच्या पॉलिसीविरुध्द जातील त्यांना बॅन केले जाते. त्याशिवाय जर अकाऊंट्सबाबत कंपनीला कंप्लेंट मिळल्यास अकाऊंट बॅन केले जाते. तक्रार निवारणसाठी (Grievance Redressal) WhatsApp ला एकूण २८५ रिक्वेस्ट आल्या होत्या. त्यापैकी व्हॉट्सअॅपने २४ अकाऊंट्स बॅन केले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १८,५८,००० अकाऊंटला जानेवारी महिन्यात बॅन करण्यात आले. WhatsApp ने अकाऊंट्सला प्लॅटफॉर्मला हार्म बिहेव्हियरपासून वाचविण्यासाठी बॅन करते. WhatsAppचा दावा आहे की, कोणतेही हार्मफुल बिहेव्हियर होण्या आधीच ते थांबवतात.
Whats App चे अॅब्यूज डिटेक्शन अकाऊंट बॅन करण्यामुळे प्रायमरी पॅरामीटर, अॅब्यूज डिटेक्शन पॅरामीटर कोणत्याही अकाऊंटमध्ये तीन स्टेजवर ऑपरेट होते. त्यामध्ये रजिस्ट्रेशनच्या वेळी लाईफस्टाईल, मेसेजिंग आणि निगेटिव्ह फिडबॅकबाबत रिस्पॉन्स समाविष्ट आहे.
WhatsAppने कोणतीही पूर्वसूचना न देता अकाऊंट बॅन करू शकते. जर तुमचे अकाऊंट बॅन झाले तर तुम्हाला व्हॉटस् अॅप वर "Your phone number is banned from using WhatsApp. Contact support for help'' असा संदेश स्क्रिनवर दिसेल. तुम्हाला जर असे वाटत असेल की चुकून तुमचे अकाऊंट बॅन झाले आहे तर त्यासाठी तुम्ही कंपनीला मेल पाठवू शकता.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.