Whatsapp Meta AI : व्हॉट्सॲपला लवकरच एक जबरदस्त AI अपडेट मिळणार आहे. या अपडेटमध्ये व्हॉट्सॲपवरील मेटा AI ला अनेक नवीन फीचर्स मिळणार आहेत. मेटाच्या मालकीच्या या चॅटिंग ॲपने मंगळवारी नवीन इमेज जनरेशन फीचर्स आणि ॲपच्या AI असिस्टंटसाठी बहुभाषिक सपोर्ट जाहीर केला. ही फीचर्स अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर उपलब्ध होतील, पण सर्वच फीचर्स जागतिक पातळीवर लॉन्च होणार नाहीत.
व्हॉट्सॲपवरचा मेटा AI (Meta AI) आता २२ देशांमध्ये उपलब्ध होणार आहे. या नव्या देशांमध्ये अर्जेंटिना, चिली, कोलंबिया, इक्वेडोर, मेक्सिको, पेरू आणि कॅमेरूनचा समावेश आहे. त्याचबरोबर, या चॅटबॉटला आता फ्रेंच, जर्मन, हिंदी (देवनागरी आणि रोमन लिपी दोन्ही), इटालियन, पोर्तुगीज आणि स्पॅनिश या नव्या भाषांचा सपोर्ट मिळणार आहे. कंपनीने येत्या काही महिन्यांत आणखी भाषांचा सपोर्ट वाढवण्याचीही घोषणा केली आहे.
इमेज जनरेशन फीचर्सच्या बाबतीत, व्हॉट्सॲपवरील मेटा AI ला 'इमेजिन मी' (Imagine Me Feature) फीचर मिळणार आहे. या फीचरमुळे वापरकर्ते स्वतःचे फोटो वापरून AI जनरेटेड सेटिंग आणि स्टाईलमध्ये स्वतःचे इमेज तयार करू शकतील.या फीचरचा गैरवापर होऊ नये म्हणून वापरकर्त्याला प्रथम स्वतःचा फोटो काढावा लागेल. हे फीचर सध्या अमेरिकेतच बेटा फेजमध्ये उपलब्ध आहे. येत्या काळात ते आणखी देशांमध्येही येऊ शकते.
आणखी एक मनोरंजक फीचर म्हणजे 'इमेजिन एडिट' (Imagine Edit) . या फीचरमुळे वापरकर्ते AI जनरेटेड इमेजमध्ये बदल करू शकतील. वापरकर्ते टेक्स्ट प्रॉम्प्ट्स वापरून ऑब्जेक्ट्स, बॅकग्राउंड इत्यादी गोष्टी वाढवू शकतात, काढू शकतात किंवा बदलू शकतात. उदाहरणार्थ, एखादा पुरुष योगा करत असलेली इमेज जनरेट केल्यानंतर वापरकर्ते मेटा AI ला ती सेटिंग बदलण्यास किंवा योगची पोज बदलण्यास सांगू शकतात. हे फीचर जागतिक पातळीवर लॉन्च होणार आहे.
अखेरच्या फीचरमध्ये व्हॉट्सॲपला एक अप्रतिम फीचर मिळणार आहे. वापरकर्त्यांना नुकताच लॉन्च झालेला मेटा लॅमा 3.1 405B AI मॉडेल वापरण्याचा पर्याय मिळेल. कंपनीचा दावा आहे की हा AI मॉडेल जटिल प्रश्नांचे उत्तम प्रकारे हाताळू शकतो, गुंतागुंतीच्या गणिती समस्या सोडवू शकतो आणि अधिक प्रभावीपणे कोड लिहू शकतो. हे फीचरही जागतिक पातळीवर लॉन्च होण्याची अपेक्षा आहे, पण कंपनीने अद्याप त्याची पुष्टी केलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.