WhatsApp Update Sakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Update : व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रोफाईलवर दिसणार तुमचा नवा 'अवतार'

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या अपडेटमुळे प्रोफाईल पिक्चर लावण्याची मजा द्विगुणित होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp Update News : व्हॉट्सअ‍ॅप (Whatsaap) बीटा प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन फीचर्सची टेस्टिंग करत असून, ते लवकरच सादर केले जाऊ शकतात, अशी माहिती व्हॉट्सअॅप फीचर ट्रॅकिंग वेबसाइट WABetaInfo ने दिली आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपच्याने प्रोफाईल पिक्चरसाठी अवतार नावाचे एक फिचर लाँच केले आहे. यामुळे आता प्रोफाइल पिक्चर लावण्याची मजा द्विगुणित होणार आहे. (Whatsaap New Update News In Marathi)

whatsaap
whatsaap group

या फीचरच्या मदतीने यूजर्स प्रोफाईल पिक्चरमध्ये (Whatsaap Profile Picture) त्यांचा नवीन अवतार मित्र आणि कुटुंबीयांना दाखवू शकतात. यासाठी व्हॉट्सअॅप सेटिंग्जमध्ये जाऊन डिजिटल अभिव्यक्ती असलेले अवतार स्टिकर्स प्रोफाइल पिक्चर म्हणून सेट करता येईल.

अवतारनंतर येणार आणखी जबरदस्त फिचर्स

स्क्रीनशॉट ब्लॉकिंग : WhatsApp अशा एका अशा फीचरवर काम करत आहे, ज्याद्वारे चॅट आणि फोटोंचा स्क्रीनशॉट घेता येऊ शकणार नाही. तसेच स्क्रीन-रेकॉर्डिंगही करता येणार नाहीये.

Clickable Links : व्हॉट्सअॅपचे स्टेटस फीचर जबरदस्त असून, यूजर्स या फीचरद्वारे फोटो, व्हिडिओ आणि टेक्स्ट शेअर करू शकणार आहे. यासंबंधीचे फीचर लवकरच लाँच करण्यात येणार आहे. हे फिचर लॉन्च झाल्यानंतर युजर कोणत्याही वेबसाइटची URL स्टेटस म्हणून शेअर करू शकतील.

साइडबार : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हाट्सएप लवकरच डेस्कटॉप आवृत्तीवर साइडबार जोडण्याच्या विचार करत आहे. ज्यामुळे युजर त्यांच्या कॉन्टक्टद्वारा शेअर केलेले स्टेटस अगदी सहज डेक्सटॉप आणि लॅपटॉपवर पाहू शकणार आहेत.

WhatsApp प्रीमियम : वरील अपडेटशिवाय कंपनी प्रीमियम सबस्क्रिप्शनवर देखील काम करत आहे, जी व्यावसायिक युजर्ससाठी ऑफर केली जाणार आहे.. यामध्ये, युजर्सला कस्टम बिझनेस लिंक्ससह एका फोनमध्ये 3 पेक्षा जास्त अकाउंट ऑपरेट करण्याची सुविधा दिली जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT