WhatsApp News : अँड्रॉइड आणि आयफोन यूजर्सना आज मोठा झटका बसणार आहे. कारण 24 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून काही जुन्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp वापरता येणार नाही. अशा परिस्थितीत, तुमचा स्मार्टफोन व्हॉट्सअॅप बंदीच्या यादीत समाविष्ट नाही ना? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
या स्मार्टफोन्समध्ये बंद होणार WhatsApp
अॅपलकडून अलीकडेच एक निवेदन जारी करण्यात आले आहे की, इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp कंपनीच्या iOS 10 आणि iOS 11 डिव्हाइसला सपोर्ट करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोप्या भाषेत सांगायचे तर, Apple चे iOS 10 आणि iOS 11 युजर्स आजपापासून WhatsApp चा वापर करू शकणार नाहीत.
तर, Android 4.1 किंवा त्यापूर्वीच्या सर्व स्मार्टफोनवर WhatsApp वापरता येणार नाहीये. सध्या Android 13 अपडेट रोल आउट केले जात आहे. तर, Apple iOS 16 चे अपडेट दिले जात आहे. अशा परिस्थितीत अॅपलच्या 8 वर्ष जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. तर Android च्या जवळपास 12 वर्षे जुन्या डिव्हाइसमध्ये WhatsApp वापरता येणार नाही.
म्हणून बंद होतंय व्हॉट्सअप
अनेक मोबाईल कंपन्या जुन्या स्मार्टफोनसाठी अपडेट्स जारी करत नाहीयेत. अशा परिस्थितीत जुन्या स्मार्टफोनमध्ये हॅकिंग आणि बँक फसवणूक सहज होण्याचा धोका आहे. तसेच चॅट लीकसारख्या घटनाही घडू शकतात. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अशा स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद केले जात आहे.
असे करा चेक
आजापासून बंद करण्यात येणाऱ्या व्हॉट्सअपच्या बंद होणाऱ्या यादीत तुमचाही फोनचा समावेश नाही ना? हे तपासण्यासाठी तुम्ही आयफोनच्या सेटिंगमधील जनरल या पर्यायावर जाऊन iOS च्या नव्या अपडेटबद्दल माहिती मिळवू शकता आणि तुमचा iPhone iOS 13 किंवा त्याहून जुना आहे का ते तपासू शकता.
अँड्रॉइड स्मार्टफोन यूजर्सने सेटिंगमध्ये जाऊन ऋअबाउट फोनवर क्लिक करावे. यानंतर सॉफ्टवेअर माहिती ऑप्शनवर क्लिक केल्यास तुम्ही सॉफ्टवेअर अपडेटबाबत माहिती मिळवू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.