WhatsApp Protect Feature : मेसेंजर App व्हॉट्सअॅपने एक नवीन फिचर आणलं आहे. जे ऑन केल्यानंतर युजरची व्हॉट्सअॅप कॉलिंग सुविधा सुरक्षित होणार आहे. अगदी दहा सेकंदांमध्ये सोप्या टिप्स फॉलो केल्या तर तुमची चिंता मिटणार आहे.
व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये उपलब्ध झालेल्या फिचरचा फायदा घेतला तर आयपी अॅड्रेस सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे कुठलीच माहिती चोरली जावू शकत नाही. व्हॉट्सअॅप कॉलिंग, फोटो, व्हिडीओ शेअरिंग आणि मेसेज सुरक्षित ठेवण्यासाठी ही सेटिंग करणं गरजेचं आहे.
'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा
सुरुवातीला व्हॉट्सअॅपमध्ये उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर टॅप करा. त्यानंतर सेटिंग्समध्ये जावून प्रायव्हसीवर टॅप करा.
प्रायव्हसीमध्ये Advaced वर टॅप करा. पुढे Protect IP Adress in calls यावर टॅप करुन हा ऑप्शन ऑन करावा.
या सेटिंगमुळे युजरचा आयपी अॅड्रेस सुरक्षित राहणार आहे आणि कुणालाही तुमचं लोकेशन ट्रॅक करता येणार नाही. शिवाय इतरही सुविधा यामुळे मिळणार आहेत. मेटाकडून नेहमी युजरच्या सुरक्षेचा विचार केला जातो. त्यामुळे नवनवीन फिचर आणले जातात. ते फॉलो केले तर तुमचा डेटा सुरक्षित राहू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.