WhatsApp Sakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Call: विदेशीनंबर वरुन व्हॉट्सअॅप कॉल येतोय? खुश होऊ नका.. बँक खातं रिकामं होईल, अशी घ्या काळजी

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप यूजर्सना अचानक असे कॉल येत आहेत.

राहुल शेळके

WhatsApp International Call: तुम्हाला +212, +84, +62, +60 सारख्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून WhatsApp कॉल येत आहेत. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त काळजी घ्या. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप यूजर्सना अचानक असे कॉल येत आहेत.

अनेक लोक दररोज ट्विटर, फेसबुक आणि सोशल मीडियावर अशा कॉल्सबद्दल त्यांचे अनुभव शेअर करत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून व्हॉट्सअॅप कॉल्सची संख्या वेगाने वाढली आहे. त्यामुळे भारतीय सायबर सुरक्षा संस्थाही सतर्क झाल्या आहेत.

व्हॉट्सअॅप कॉलच्या मागे आंतरराष्ट्रीय स्कॅमर:

व्हॉट्सअॅप कॉल्समागे आंतरराष्ट्रीय घोटाळेबाजांचा हात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ते मालवेअरसारखे धोकादायक व्हायरस ट्रान्सफर करत आहेत. काही वेळा कॉल ब्लँक असतात. अनेक वेळा व्हॉट्सअॅपवर अशाच कॉलद्वारे लिंक पाठवल्या जात आहेत.

त्या लिंकवर क्लिक करणे धोकादायक आहे. सध्या फसवणूक कॉल ट्रेस करणे अत्यंत कठीण होत आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा नंबरवरून येणारे कॉल उचलण्याची किंवा व्हॉट्सअॅप मेसेजला उत्तर देण्याची गरज नाही.

व्हॉट्सअॅप यूजर्स आता सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर आहेत. हे कॉल्स दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, इंडोनेशिया आदी ठिकाणांहून येत असल्याचे समजते. हे कॉल व्हॉट्सअॅपवर VOIP नेटवर्कद्वारे येतात.

फक्त नंबर ब्लॉक करू नका, त्याची तक्रारही करा

सध्या केवळ दिल्ली पोलीसच नाही तर विविध राज्यांच्या पोलिसांनाही परदेशी नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यांचा हेतू काय आहे? सायबर सुरक्षा एजन्सी आता याची खातरजमा करत आहेत.

जर तुम्ही चुकून कॉल उचलला असेल आणि फसवणुकीला बळी पडला असाल, तर उशीर न करता सायबर सेलकडे तुमची तक्रार नोंदवा. कॉल डिस्कनेक्ट करा आणि ब्लॉक आणि रिपोर्ट बटण दाबा. तुम्हालाही मेसेज येत असतील तर हे उपाय करा.

पहिला मेसेज येताच, चॅट-स्क्रीनवर दर्शविलेल्या नंबरवर क्लिक करा. Media, Links किंवा Mute असे अनेक पर्याय दिसतील. खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला ब्लॉक आणि रिपोर्टचा पर्याय दिसेल. फक्त नंबर ब्लॉक करू नका, तर तक्रार करा.

प्रसिद्ध सायबर तज्ज्ञ डॉ. रक्षित टंडन म्हणाले, यामागे मोठे आंतरराष्ट्रीय घोटाळेबाज आहेत. स्कॅमर तुमच्या संपर्क आणि डेटा चोरण्यासाठी या नावाखाली मालवेअर वापरत आहेत. त्यामुळे कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. तुम्ही अज्ञात लिंकवर क्लिक करताच तुमचा डेटा लिक होण्याचा धोका असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT