WhatsApp Companion Mode : फायनली व्हॉट्सॲप युजर्स आता चार अँड्रॉइड उपकरणांवर इन्स्टंट मेसेजिंग ॲप वापरू शकतात. सध्या, व्हॉट्सॲप आपल्या युजर्सना एकाच वेळी डेस्कटॉप तसेच स्मार्टफोनवर लॉग इन करण्याची परवानगी देते.
व्हॉट्सॲपने नव्या फीचरची अनेक महिने चाचणी केल्यानंतर अखेर सर्व बीटा टेस्टर्ससाठी कंपॅनियन मोड फीचर लाँच केले आहे. हे फीचर युजर्सना एकाच वेळी चार उपकरणे कनेक्ट करण्याची आणि त्या सर्वांमध्ये चॅट हिस्ट्री सिंक करण्याची अनुमती देते.
WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, हे फीचर Android v2.23.8.2 साठी WhatsApp beta च्या companion मोडसह प्रत्येकासाठी सुरू करण्यात आले आहे. म्हणजेच, जर तुम्ही बीटा युजर असाल, तर तुम्ही व्हॉट्सॲप अँड्रॉइड बीटाचे लेटेस्ट व्हर्जन अपग्रेड करू शकता.
मात्र, डाउनलोड सुरू केल्यानंतर, सर्व बीटा टेस्टर्सना हे फीचर वापरण्यास सक्षम होण्यासाठी 24 तास लागू शकतात. सध्या iOS वापरकर्ते व्हॉट्सॲपचे नवीन फीचर वापरू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, त्यांना या फीचरचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांच्याकडे Android फोन किंवा टॅबलेट असणे आवश्यक आहे.
कँपॅनियन मोडद्वारे चार डिव्हाइसवर असे करा व्हॉट्सॲप युज
- तुमचा दुसरा Android मोबाइल डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला Google Play Store वरून WhatsApp Messenger किंवा WhatsApp Business चे लेटेस्च बीटी व्हर्जन डाउनलोड करावे लागेल.
- यानंतर कलेक्ट A डिव्हाइस या ऑप्शनवर क्लिक करा आणि डिव्हाइस कनेक्ट करावा.
- व्हॉट्सॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मेन डिव्हाइसच्या सेटिंगमध्ये जाऊन कनेक्टेड डिव्हाइस हा ऑप्शन सिलेक्ट करावा.
- त्यानंतर, तुमच्या बॅकअप स्मार्टफोनवरील QR कोड स्कॅन करण्यासाठी दुसरा डिव्हाइस वापरा.
- चारही डिव्हाइसमध्ये हिस्ट्री होईल सिंक
- या स्टेप्स फॉलो करून, तुम्ही एका वेळी चार डिव्हाइसवर WhatsApp वापरण्याचा आनंद घेऊ शकता. यासाठी, तुम्हाला तुमच्या डेटाच्या इतिहासाची काळजी करण्याची गरज नाही. हे फीचर तुमची व्हॉट्सॲप हिस्ट्री चारही डिव्हाइसवर सिंक करेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.