WhatsApp New Feature eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp New Feature : आता नंबर सेव्ह न करताही करता येईल चॅट; व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन फीचर समोर

Sudesh

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर आता जवळपास स्मार्टफोन बाळगणारे सर्वच लोक करतात. जगातील सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप म्हणून व्हॉट्सअ‍ॅप ओळखलं जातं. आपल्या यूजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅप वेळोवेळी नवीन अपडेट्स लाँच करत असते. आता यूजर्सना बऱ्याच काळापासून हवं असणारं एक फीचर व्हॉट्सअ‍ॅपने समोर आणलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरमुळे आता यूजर्स एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर सेव्ह न करताही त्याला मेसेज करू शकणार आहेत. यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर कुणाला मेसेज करायचा असल्यास, त्या व्यक्तीचा नंबर अगोदर सेव्ह करणं गरजेचं होतं. मात्र, आता तशी गरज उरणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स बऱ्याच काळापासून या फीचरची प्रतीक्षा करत होते.

ठरावीक यूजर्सना उपलब्ध

व्हॉट्सअ‍ॅपच्या फीचर्सबाबत माहिती देणारी वेबसाईट WABetaIfo ने याबाबत माहिती दिली आहे. सध्या हे फीचर ठराविक यूजर्सना मिळालं आहे. लवकरच हे आयओएस यूजर्स आणि सर्व अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. (WhatsApp New Feature)

असा करा वापर

हे फीचर वापरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावं लागेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट व्हर्जनवरच हे फीचर उपलब्ध आहे. यानंतर तुम्हाला नवीन व्यक्तीसोबत चॅट करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅप उघडा. त्यानंतर 'न्यू चॅट' पर्यायासाठी असणाऱ्या आयकॉनवर टॅप करा. यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीला मेसेज करायचा आहे, तिचा नंबर टाईप करा. या नंबरचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट उपलब्ध असल्यास, व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला थेट या व्यक्तीच्या इनबॉक्समध्ये नेईल. यानंतर तुम्ही चॅट सुरू करू शकता.

WhatsApp New Feature

औपचारिक घोषणा नाही

व्हॉट्सअ‍ॅपकडून अद्याप या फीचरची औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. व्हॉट्सअ‍ॅपची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटानेही याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र, कित्येक यूजर्सना अपडेटेड व्हॉट्सअ‍ॅपवर हे फीचर मिळालं आहे. त्यामुळे, तुम्हीदेखील लगेच आपलं व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करून तुम्हाला हे फीचर मिळालं आहे का ते तपासू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Animal Fat in Temple: जगनमोहन रेड्डींनी तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये वापरली जनावरांची चरबी? CM चंद्राबाबूंच्या आरोपाने खळबळ

Mumbai: विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट; तब्बल इतके मोबाईल केले लंपास, लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सर्वाधिक

One Nation One Election: ...तर पुढील विधानसभा ४.५ वर्षांची; यंदाच्या निवडणूक वेळापत्रकात बदलाची शक्यता नाही

IND vs BAN 1st Test Live Streaming: भारत-बांगलादेश पहिली कसोटी 'फ्री' मध्ये पाहा; किती वाजता, कोणत्या चॅनेलवर अन् ॲपवर दिसणार?

Cutlet Recipe: सकाळी नाश्त्यात मुग, मटकीपासून बनवा बहुगुणी कटलेट, दिवसभर राहाल उत्साही

SCROLL FOR NEXT