WhatsApp New Features Esakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp New Features : व्हॉट्सअ‍ॅपवर आले नवीन फीचर्स! इंटरफेसमध्ये बदल, यूजरनेम ठेवता येणार

या अपडेटनंतर अँड्रॉईडमधील व्हॉट्सअ‍ॅपचा इंटरफेस हा आयफोन प्रमाणे असेल.

Sudesh

व्हॉट्सअ‍ॅप सध्या सातत्याने नवनवीन फीचर्स लाँच करत आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने पाठवलेले मेसेज एडिट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यानंतर आता आणखी एका नवीन फीचरची चाचणी व्हॉट्सअ‍ॅप करत आहे. यामुळे आता यूजर्सना या मेसेजिंग अ‍ॅपवर चॅटिंग करताना आणखी मजा येणार आहे.

बीटा व्हर्जनवर नवे फीचर्स

व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉईडसाठी असलेल्या २.२३.११.१५ या बीटा व्हर्जन अपडेटवर (WhatsApp Beta) नवीन फीचर्स दिसत आहेत. या अपडेटमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा यूजर इंटरफेस बदलण्यात आला आहे. यामध्ये ग्रुप सेटिंग्सचे डिझाईन देखील बदलण्यात आले आहे.

आयफोन प्रमाणे दिसणार

या अपडेटनंतर अँड्रॉईडमधील व्हॉट्सअ‍ॅपचा इंटरफेस हा आयफोन प्रमाणे असेल. यामुळे कॉल्स, स्टेटस आणि चॅट्स टॅब हे पर्याय स्क्रीनच्या खालच्या बाजूला दिसतील. व्हॉट्सअ‍ॅप फीचर्स (WhatsApp new Features) आणि अपडेट्स यांना ट्रॅक करणारी वेबसाईट WABetaInfo यांनी आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

ग्रुप सेटिंगमध्ये बदल

या अपडेटमध्ये ग्रुप सेटिंग्समध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. या सेटिंग्समधील पर्याय अधिक सुटसुटीत करण्यात आले आहेत. ग्रुप सेटिंग्स इनेबल किंवा डिसेबल करण्याचा पर्याय एकाच ठिकाणी दिसेल, तर कित्येक इतर टॉगल्स देखील एकाच ठिकाणी दिसतील.

ठेवता येणार यूजरनेम

व्हॉट्सअ‍ॅपने मागेच जाहीर केल्याप्रमाणे मोबाईल नंबरऐवजी यूजरनेम ठेवण्याचा ऑप्शन (WhatsApp Username feature) या अपडेटमध्ये देण्यात आलेला आहे. कित्येक वेळा एखाद्या ग्रुपमध्ये तुम्ही जोडले जाता, आणि तिथल्या लोकांची तुम्हाला माहिती नसते. अशा वेळी एखाद्या व्यक्तीने मेसेज केल्यानंतर तिचा मोबाईल नंबर तुम्हाला दिसतो. मात्र, या अपडेटनंतर मोबाईल नंबरऐवजी तुम्हाला त्या व्यक्तीने आपले जे यूजरनेम ठेवले आहे, ते दिसेल.

लाँचिंगला लागेल वेळ

हे अपडेट सर्व यूजर्ससाठी लाँच व्हायला आणखी वेळ लागेल, असं व्हॉट्सअ‍ॅपकडून सांगण्यात आलं आहे. यूजर्सना अधिकाधिक क्लीन इंटरफेस आणि चॅटिंगचा अधिक चांगला अनुभव देण्यासाठी अ‍ॅपमध्ये वेळोवेळी अपडेट करण्यात येतील असं कंपनीकडून सांगण्यात आलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT