Whatsapp Feature: esakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Microphone Issue: व्हॉट्सअॅपकडून गोपनियतेचा भंग! सरकारनं व्यक्त केली चिंता

परवानगीशिवाय व्हॉट्सअॅपनं माईक वापरल्याचे स्क्रीनशॉट एका युजरनं शेअर केल्यानं खळबळ उडाली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : ट्विटरच्या एका इंजिनिअरनं परवानगीशिवाय व्हॉट्सअॅपनं आपल्या मोबाईल फोनचा माईक वापरल्याचे स्क्रीनशॉट शेअर केल्यानं खळबळ उडाली होती. याद्वारे व्हॉट्सअॅपनं युजरच्या गोपनियतेचा भंग केल्याचा आरोपही या इंजिनिअरनं केला होता. यावर भारत सरकारकडून चिंता व्यक्त केली आहे. तसेच व्हॉट्सअॅफनं या प्रकारावर स्पष्टीकरण दिलं आहे. (WhatsApp Microphone Issue Breach of privacy by WhatsApp government also expressed concern)

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विटरवरील इंजिनिअर फोड डबिरी यांच्या ट्विटवर चिंता व्यक्त केली. फोड यांनी व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या फोनच्या मायक्रोफोनचा वापर केल्याचा आरोप करत त्याचे स्क्रीनशॉटसह ट्विटरवर पोस्ट केले होते.

मेटाच्या पब्लिक पॉलिसी इंडियाचे संचालक शिवनाथ ठुकराल यांनी मंत्री चंद्रशेखर यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना म्हटलं की, “गेल्या 24 तासांपासून आम्ही संबंधित ट्विटर इंजिनिअरच्या संपर्कात आहोत ज्यानं आपल्या गुगल पिक्सेल फोनबाबत घटलेली समस्या ट्विट केली आहे. आम्हाला विश्वास आहे हा Android वरील एक बग आहे, ज्यानं संबंधित युजरच्या गोपनीयता डॅशबोर्डमधील माहितीचा अॅक्सेस चुकीच्या पद्धतीनं मिळवला. याबाबत आम्ही गुगलला विनंती करुन याची चौकशी करण्यास सांगितलं आहे"

युजरचं मायक्रोफोन सेटिंग्जवर पूर्ण नियंत्रण - WhatsApp

एकदा परवानगी मिळाल्यावर, जेव्हा युजर कॉल करत असेल किंवा व्हॉइस नोट किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करत असेल तेव्हाच WhatsApp माइकमध्ये प्रवेश करते. तरीही यातील संभाषण लीक होऊ नये यासाठी हे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित केलं जातं, यामुळं WhatsApp त्यांचं संभाषण ऐकू शकत नाही, असं व्हॉट्सअॅपनं म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT