WhatsApp to Introduce Internet-Free File Sharing Feature  esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Update : व्हॉट्सॲपचं जबरदस्त फिचर! इंटरनेट नसलं तरी शेअर करता येणार फोटो आणि व्हिडिओ; तुमच्या ॲपमध्ये अपडेट आलंय का?

Whatsapp Near By Share : व्हॉट्सॲपच्या वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच तुम्ही इंटरनेटशिवायही तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आणि इतर फाइल्स सहजपणे शेअर करू शकणार आहात.

Saisimran Ghashi

Whatsapp New Feature : व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवनवीन फीचर घेऊन येत असते. यामध्ये व्हॉइस स्टेटस, कृत्रिम बुद्धिमत्ता, एचडी क्वालिटी फोटो डीपी आणि बऱ्याच सुविधा कंपनीकडून दिल्या जात आहेत. भविष्यात अनेक नवनवीन सुविधा वापरकर्त्यांना देण्याचे कंपनीचे धोरण आहे. अशात कंपनीने आणखी एक नवीन धमाकेदार फीचर लॉन्च केले आहे. नव्या अपडेटसह हे फीचर तुम्हाला वापरता येणार आहे.

व्हॉट्सॲपच्या वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच तुम्ही इंटरनेटशिवायही तुमच्या जवळच्या व्यक्तींना फाइल्स शेअर करू शकणार आहात.हो तुम्ही अगदी बरोबर ऐकल. यासाठी व्हॉट्सॲपने ‘नियरबाय शेअर’ नावाच एक नवीन फीचर तयार केलं आहे.

या फीचरमुळे तुम्ही फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आणि इतर फाइल्स सहजपणे शेअर करू शकाल. यासाठी तुम्हाला इंटरनेट कनेक्शनची गरज भासणार नाही. हे फीचर सध्या बेटा टेस्टिंगच्या टप्प्यात आहे.

अॅप्लिकेशनच्या स्क्रीनशॉटनुसार, या फीचरमध्ये क्यूआर कोड स्कॅन करण्याची सुविधा असणार आहे. यामुळे फाइल्स शेअर करणं सोपं होणार आहे. या फीचरमुळे खराब इंटरनेट कनेक्शन असलेल्या ठिकाणी किंवा अजिबात इंटरनेट नसतानाही फाइल्स शेअर करता येणार आहे.

तंत्रज्ञांच्या मते, हे फीचर अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीवर वापरता येईल. त्यामुळे वापरकर्त्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. तसंच, ही फीचर एन्ड-टू-एन्ड क्रिप्टोग्राफीसह सुरक्षित असणार आहे. त्यामुळे तुमच्या फाइल्स सुरक्षित राहतील.

सध्या हे फीचर विकसनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे अंतिम आवृत्तीमध्ये काही बदल होऊ शकतात. पण लवकरच हे फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

या नव्या फीचरमुळे व्हॉट्सॲपचा वापर आणखी सोपा आणि प्रभावी होणार आहे. यामुळे वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे, यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT