मेटा कंपनीच्यामालकीचे सुप्रसिध्द इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना नवीन सुविधा आणि नवीन फीचर्स देण्यासाठी सतत काहतरी नवीन करत असता. आता व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मोठा बदल करणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरचा मागोवा घेणारी वेबसाइट WABetaInfo नुसार व्हॉट्सअॅप आता ग्रुपमधील अॅड सदस्यांची मर्यादा वाढवणार आहे. या अपडेटनंतर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 1024 सदस्य जोडता येतील.
या वर्षी मे महिन्यात व्हॉट्सअॅपमधील ग्रुप सदस्यांची संख्या बदलत 256 सदस्यांवरून 512 सदस्य करण्यात आली होती. आता व्हॉट्सअॅप हा नंबरही दुप्पट करण्याचा विचार करत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp ने सध्या हे फीचर बीटा टेस्टर्सपुरते मर्यादित केले आहे. लवकरच हे फीचर इतर युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाऊ शकते. असा दावाही केला जात आहे की व्हॉट्सअॅप 2GB पर्यंतच्या फाइल्स शेअर करण्यासाठीचे अपडेट जारी करणार आहे.
WhatsApp प्रीमियम (WhatsApp Premium)
व्हॉट्सअॅपने बिझनेस अॅपच्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅप प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील सुरू केले आहे, जरी या क्षणी फक्त काही मोजक्याच वापरकर्त्यांना त्याचे अपडेट मिळत आहे. व्हॉट्सअॅप प्रीमियमचे अपडेट बीटा वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले आहे. बीटा वापरकर्ते त्यांच्या अॅपमध्ये प्रीमियम मेनू पाहू शकतात. वापरकर्त्यांना प्रीमियम मेनूमध्ये अनेक अतिरीक्त फीचर्स मिळतील.
मात्र प्रीमियम सब्सक्रिप्शन हे केवळ बिझनेस अॅपसाठी आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सामान्य वापरकर्ता असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रीमियम सबस्क्रिप्शन अंतर्गत, बिझनेस अॅप वापरकर्त्याला कॉन्टॅक्ट लिंक कस्टमाइझ करण्याचा पर्याय मिळेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.