WhatsApp Safety Features eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Safety Features : व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉईड यूजर्ससाठी आणले नवे सेफ्टी फीचर्स! जाणून घ्या सविस्तर

Sudesh

WhatsApp Safety Tools : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्समध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा समावेश होतो. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स लाँच करत असतं. सोबतच, आपल्या यूजर्सच्या सुरक्षेची काळजीही व्हॉट्सअ‍ॅप करतं. यामुळेच व्हॉट्सअ‍ॅपने आता आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन सेफ्टी टूल्स तयार केले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपमधील अपडेट्सची माहिती देणाऱ्या WABetaInfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या मेसेजबाबत व्हॉट्सअ‍ॅपने हे नवीन सेफ्टी फीचर तयार केलं आहे. सध्या हे फीचर काही बीटा यूजर्सना उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

ज्या अँड्रॉईड यूजर्सकडे व्हॉट्सअ‍ॅप बीटाचं 2.23.16.6 हे व्हर्जन आहे, त्यांना हे फीचर उपलब्ध होऊ शकतं. सध्या या फीचरची चाचणी सुरू असून, लवकरच हे सेफ्टी टूल सर्व यूजर्सना उपलब्ध होईल असं सांगण्यात येत आहे. (WhatsApp new safety features)

काय आहे फीचर?

मिळालेल्या माहितीनुसार, या फीचरमुळे यूजरला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून आलेला मेसेज एका वेगळ्या प्रकारच्या स्क्रीनवर दिसणार आहे. यासोबतच, अनोळखी व्यक्तींकडून आलेले मेसेज कसे तपासावेत आणि याबाबत कशी खबरदारी घ्यावी याच्या काही टिप्स देखील व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना देईल.

एवढंच नाही, तर अनोळखी नंबरवरुन आलेला मेसेज तुम्ही वाचला आहात की नाही, हे त्या व्यक्तीला कळणार नाही. म्हणजेच, तुमचे रीड रिसिप्ट (ब्लू टिक) सुरू जरी असतील, तरीही अनोळखी व्यक्तीला तुम्ही मेसेज वाचल्यानंतरही ब्लू टिक्स दिसणार नाहीत.

तुम्ही या व्यक्तीचा नंबर सेव्ह केला, किंवा त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला तरच तुम्ही मेसेज वाचला असल्याचं या व्यक्तीला कळणार आहे. तुम्हाला या व्यक्तीचे मेसेज नको असतील तर तुम्ही तिला ब्लॉक करू शकता. किंवा मग त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या मॉडरेटर टीमला रिपोर्टही करू शकता.

या फीचर्समुळे यूजरना अनोळखी नंबरवरुन होणारा त्रास कमी होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने गुरुवारी आपल्या यूजर्ससाठी व्हिडिओ मेसेजिंग फीचरही लाँच केलं होतं. या माध्यमातून यूजर्स आता ऑडिओ मेसेजप्रमाणे व्हिडिओ मेसेज पाठवू शकणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: "आरक्षण न दिल्यास उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदार असतील," मनोज जरांगे पाटील यांचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Pune Ganpati Visarjan: पुण्यात अवजड वाहनांना कधीपर्यंत प्रवेश बंदी? दुचाकी आणि चारचाकीसाठी कुठे असेल पार्किंग? जाणून घ्या

Mumbai Local News: मुंबईकरांची गणेश विसर्जन मिरवणूक दणक्यात! अनंत चतुर्थीला 22 जादा लोकल; जाणून घ्या वेळापत्रक

BJP MLA fell on track: झोक गेला अन् भाजपची महिला आमदार थेट रेल्वे रुळावर पडली; पाहा Video

Ganesh Visarjan 2024 LIVE : दुपारी ४ वाजता होणार दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT