WhatsApp  Sakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Scam: सावधान! WhatsApp वर आला नवा स्कॅम, नंबर डायल करताच तुमचे अकाउंट होईल हॅक

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वर नवीन स्कॅम आला आहे. यूजरला अनोळखी मोबाइल नंबरवर कॉल करण्यास सांगून फसवणूक केली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

WhatsApp Scams in 2022: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp यूजर्सची संख्या कोट्यावधीच्या घरात आहे. लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असल्याने सायबर गुन्हेगार देखील याच्या माध्यमातून यूजर्सची मोठ्याप्रमाणात फसवणूक करत असतात. आता असाच एक स्कॅम समोर आला असून, ज्याद्वारे यूजर्सच्या WhatsApp अकाउंटचा अ‍ॅक्सेस चोरी केला जात आहे.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

या स्कॅममध्ये WhatsApp यूजरला अनोळखी नंबरवरून कॉल केला जातो. कॉल करणारी व्यक्ती ब्रॉडबँड, केबल मॅकेनिक अथवा इंजिनिअर असल्याचे सांगते. अनेकदा स्कॅमर टेलिकॉम ऑपरेटर रिप्रेजेंटेटिव्ह असल्याचे देखील सांगतात. स्कॅमर्स यूजरचे कनेक्शन बंद केले जाणार असल्याची धमकी देखील देतात. तसेच, कनेक्शन बंद करू नये यासाठी एक ठराविक नंबर डायल करण्यास सांगितले जाते. यूजरला ४०१* आणि एक मोबाइल नंबर डायल करण्यास सांगितले जाते.

हा नंबर डायल करताच यूजरच्या WhatsApp अकाउंटचा अ‍ॅक्सेस काढून घेतला जातो. स्कॅमर स्वतःच्या अकाउंटमध्ये यूजरच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटला अ‍ॅक्सेस करतात. तुम्ही ४०१* कोडनंतर जो नंबर डायल करता, त्यावर कॉल ट्रान्सफर होतात. ४०१* हा एक कॉल डायवर्ट कोड आहे. स्कॅमर या कोडलाच डायल करण्यास सांगतात. त्यानंतर ओटीपीद्वारे स्वतःच्या फोनमध्ये यूजरच्या WhatsApp अकाउंटला लॉग इन करतात.

स्कॅमर्स अकाउंटसह टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन देखील सेट करतात. यामुळे यूजरला त्वरित स्वतःचे अकाउंट अ‍ॅक्सेस करता येत नाही. यूजर कंपनीला मेल करून अकाउंटचा अ‍ॅक्सेस मागू शकतात. परंतु, यादरम्यान स्कॅमर्स व्हॉट्सअ‍ॅप फ्रेंड्सकडे पैशांची मागणी करत लाखो रुपये उकळू शकतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेज अथवा कॉलला उत्तर देणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT