WhatsApp Screen Sharing eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Screen Sharing : आता व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर मित्रांसोबत पाहता येणार व्हिडिओ; सर्वांसाठी लाईव्ह झालं खास फीचर!

या फीचरमुळे यूजर्सना आपल्या मित्रांसोबत किंवा ऑफिसच्या कलीग्ससोबत व्हिडिओ कॉल सुरू असताना स्क्रीन शेअर करता येणार आहे.

Sudesh

WhatsApp Screen Sharing Feature : जगभरातील सुमारे दोन अब्ज लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. मेटा कंपनी आपल्या यूजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सातत्याने नवनवीन फीचर्स देत आली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने व्हिडिओ कॉलदरम्यान स्क्रीन शेअरिंगचा पर्याय देण्याची घोषणा केली होती. या फीचरची चाचणी पूर्ण झाली असून, आता हे सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे.

या फीचरमुळे यूजर्सना आपल्या मित्रांसोबत किंवा ऑफिसच्या कलीग्ससोबत व्हिडिओ कॉल सुरू असताना स्क्रीन शेअर करता येणार आहे. यामुळे एखाद्या गोष्टीचं प्रेझेंटेशन देणं, किंवा फोनमधील एखादी गोष्ट सर्वांना दाखवणं शक्य होणार आहे. या फीचरसाठी पूर्वी गुगल मीट किंवा झूम अशा अ‍ॅप्सची मदत घ्यावी लागत होती. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपमध्येच हे फीचर उपलब्ध झालं आहे. (WhatsApp Screen sharing with audio)

व्हॉट्सअ‍ॅपने खरंतर स्क्रीन शेअरिंग फीचर यापूर्वीच दिलं होतं. मात्र त्यामध्ये ऑडिओ शेअरिंगचा ऑप्शन उपलब्ध नव्हता. त्यामुळे स्क्रीनवर केवळ फोटोच समोरच्या व्यक्तीला दाखवू शकत होतो. मात्र, आता यामध्ये ऑडिओ शेअरिंगचा पर्यायही देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या मित्रांसोबत मिळून चक्क मूव्हीज किंवा व्हिडिओही पाहू शकणार आहात.

यासाठी व्हिडिओ कॉल सुरू असताना स्क्रीनवर खालच्या बाजूला तुम्हाला नवीन पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ शेअरिंग सुरू करू शकाल. टप्प्याटप्प्याने हे फीचर सर्वांना उपलब्ध केलं जात आहे. यासाठी तुम्हाला केवळ व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: लोकसभेतील राड्याचा विधानसभेवर परिणाम! निवडणूक आयोगाने धनंजय मुंडेंच्या मतदारसंघाची हायकोर्टाला दिली 'गॅरंटी'

Congress Candidates: काँग्रेसमध्ये खळबळ! तिकिट जाहीर झाल्यानंतर काही मिनिटांतच मोठ्या नेत्याने माघारी केली उमेदवारी

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना बसू शकतो मोठा धक्का! निवडणूक जिंकली तरी होणार नाहीत मुख्यमंत्री; भाजपने दिला नवा फॉर्म्युला

Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी शिवसेना अन् भाजप मैदानात, वाचा नक्की काय ठरतंय?

Sunday Special Breakfast: नाश्त्यात बनवा 'स्टफ बुर्जी पाव', रविवार होईल खास, आजच नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT