WhatsApp Dial Pad eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Dial Pad : आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये थेट डाएल करता येणार नंबर; सेव्ह करण्याची गरजच नाही

WhatsApp New Feature : ऐनवेळी एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करायचा असल्यास, तो नंबर सेव्ह करत बसावं लागतं. यानंतर तो नंबर सेव्ह होऊन, व्हॉट्सअ‍ॅप रिफ्रेश करून कॉन्टॅक्ट्समध्ये दिसेपर्यंत थांबावं लागतं.

Sudesh

WhatsApp Dial-Pad feature : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असणारे व्हॉट्सअ‍ॅप हे नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स लाँच करत असते. यामुळेच या अ‍ॅपचे जगभरात तब्बल दोन अब्जांहून अधिक यूजर्स झाले आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅप आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरुन कॉल करण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा नंबर आपल्याकडे सेव्ह असणं आवश्यक आहे. त्यामुळे ऐनवेळी एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करायचा असल्यास, तो नंबर सेव्ह करत बसावं लागतं. यानंतर तो नंबर सेव्ह होऊन, व्हॉट्सअ‍ॅप रिफ्रेश करून कॉन्टॅक्ट्समध्ये दिसेपर्यंत थांबावं लागतं. याच समस्येवर उपाय म्हणून आता व्हॉट्सअ‍ॅप एक इन-अ‍ॅप डायलर फीचर आणत आहे.

WABetaInfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. हे फीचर सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉईड बीटा 2.24.9.28 या व्हर्जनवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. या फीचरची सध्या चाचणी सुरू असून, लवकरच चे सर्व यूजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र, याची लाँचिंग डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

कसं काम करेल फीचर?

या फीचरमुळे यूजर्सना व्हॉट्सअ‍ॅपमध्येच एक डाएल पॅड मिळणार आहे. आपण नॉर्मल कॉल करण्यासाठी ज्याप्रमाणे नंबर एंटर करून थेट कॉल करू शकतो, तसंच आता व्हॉट्सअ‍ॅपमध्येही करता येईल. यामुळे अनोळखी व्यक्तींचे नंबर सेव्ह करण्याची गरज भासणार नाही, तसंच वेळही वाचेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT