WhatsApp New Feature eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp New Feature : एकदा ऐकल्यावर आपोआप डिलीट होणार ऑडिओ मेसेज; व्हॉट्सअ‍ॅपने आणलं नवीन फीचर!

Sudesh

आपल्या यूजर्सच्या प्रायव्हसी आणि सुरक्षिततेसाठी व्हॉट्सअ‍ॅप कंपनी वेळोवेळी नवीन फीचर्स आणत असते. जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपने आता आणखी एक नवं फीचर आणलं आहे. यामध्ये पाठवलेला ऑडिओ मेसेज, समोरच्या व्यक्तीला केवळ एकदाच ऐकता येणार आहे. या फीचरला सेल्फ डिस्ट्रक्टिंग ऑडिओ मेसेज असं नाव देण्यात आलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने असं फीचर यापूर्वी फोटोंना दिलं आहे. या माध्यमातून यूजर एखादा फोटो किंवा व्हिडिओ पाठवताना त्याला 'व्ह्यू वन्स' सेटिंग अप्लाय करू शकतात. यामुळे समोरच्या व्यक्तीला तो फोटो वा व्हिडिओ एकदाच पाहता येतो. आता असंच फीचर ऑडिओ मेसेजलाही देण्यात आलं आहे. एकदा ऐकल्यानंतर ऑडिओ मेसेज आपोआप डिलीट होणार आहे.

WABetaInfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर लाँच करण्यात येणार आहे. सध्या हे फीचर केवळ व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. हे फीचर कसे दिसेल आणि काम करेल याबाबत वेबसाईटवर एका स्क्रीनशॉटमध्ये माहिती दिली आहे. (Tech News)

यात दिसतंय, की व्हॉईस मेसेज प्ले करण्याच्या ठिकाणी '1' असा पर्याय दिसत आहे. यावर टॅप केल्यावर व्हॉईस मेसेज एकदा प्ले होईल आणि त्यानंतर आपोआप डिलीट होईल. या फीचरची बीटा व्हर्जनवर टेस्टिंग सुरू आहे, आणि काही दिवसांनंतर याचं अधिक स्टेबल व्हर्जन सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Ranking: हार्दिक पांड्याला 'बढती'; अर्शदीप सिंगची टॉप १० मध्ये एन्ट्री अन् वॉशिंग्टनलाही फायदा

National Award 2024 : वाळवी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायला सिनेमाच्या टीमची अनुपस्थिती ; निर्माती म्हणाली...

Latest Maharashtra News Updates : मोदींच्या हस्ते नागपूर, शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाचं भूमिपूजन

PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानी बॉलरचा ‘पोपट’ झाला! चेंडू स्टम्पला लागला, Harry Brook तरीही नाबाद राहिला, Video

यिनच्या वतीने पुण्यातील विविध महाविद्यालयात वाहतूक व रस्ते सुरक्षा जनजागृती उपक्रमाचे आयोजन.

SCROLL FOR NEXT