WhatsApp Third Party Chat eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp New Update : आता इतर अ‍ॅप्समधूनही करता येणार व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज; लाँच होणार नवीन फीचर

युरोपियन युनियनच्या आदेशामुळे कंपनीने हे फीचर देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांना हे फीचर उपलब्ध करून देण्यासाठी मार्च महिन्यापर्यंतची मुदत कंपनीला देण्यात आली आहे.

Sudesh

WhatsApp Third Party Chat Feature : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. आपल्या अब्जावधी यूजर्सचा अनुभव आणखी चांगला व्हावा यासाठी मेटा कंपनी सातत्याने व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवीन अपडेट्स आणत असते. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे देखील व्हॉट्सअ‍ॅप असणं गरजेचं होतं. मात्र आता इतर कोणत्याही अ‍ॅपवरुन व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना मेसेज करता येणं शक्य होणार आहे.

WABetainfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. सध्या हे फीचर केवळ iOS बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. याची टेस्टिंग पूर्ण झाल्यावर सर्व यूजर्ससाठी हे उपलब्ध होईल. युरोपियन युनियनच्या आदेशामुळे कंपनीने हे फीचर देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांना हे फीचर उपलब्ध करून देण्यासाठी मार्च महिन्यापर्यंतची मुदत कंपनीला देण्यात आली आहे. (WhatsApp iOS beta)

युरोपियन युनियनच्या डिजिटल मार्केट कायद्यामध्ये मोठमोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना गेटकीपर्स म्हणून चिन्हांकित केलं आहे. या प्रभावी सोशल मीडिया अ‍ॅप्सना असे आदेश देण्यात आले आहेत की त्यांनी यूजर्सना थर्ड पार्टी चॅट फीचर द्यावं. यामुळे यूजर्सना इंटरऑपरेबिलिटीचा फायदा मिळेल. (Third Party Chat)

यामुळेच आता व्हॉट्सअ‍ॅपऐवजी सिग्नल किंवा अन्य मेसेजिंग अ‍ॅप्स वापरणाऱ्या व्यक्ती देखील व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना मेसेज करू शकणार आहेत. हे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर थर्ड पार्टी चॅट अशा सेप्रेट फोल्डरमध्ये दिसतील.

यूजर्सच्या सुरक्षेचा विचार

यूजर्सच्या सुरक्षेचा विचार करुन हे फीचर ऑप्शनल ठेवण्यात आलं आहे. म्हणजेच, जर तुम्हाला दुसऱ्या अ‍ॅप्सवरुन येणारे मेसेज नको असतील तर हे फीचर तुम्ही बंद करू शकता. व्हॉट्सअ‍ॅपच्या इतर मेसेजप्रमाणेच हे मेसेज देखील एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड असणार आहेत.

हे फीचर लवकरच सर्व आयओएस आणि अँड्रॉईड यूजर्सना मिळण्याची शक्यता आहे. अर्थात, हे केवळ युरोपीय युनियनमध्ये असेल की जगभरात लागू होईल याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bishnoi community: "सलमान निर्दोष असता तर..."; सलीम खान यांच्या विधानामुळे बिश्नोई समाज संतप्त!

WI vs SL : ३ वर्षांनी आला, 'वेड्या'सारखा खेळला; संघाच्या १९६ धावांमध्ये एकट्याने कुटल्या नाबाद १०२ धावा

गोफण | येवल्याचे गगन तात्या नांदगावच्या कांदे मामांवर भारी

Nagpur Assembly Election : गिरीश पांडव, अनुजा केदार, सुरेश भोयर ठरले...दक्षिण नागपूरसह सावनेर, कामठीतील काँग्रेसचे उमेदवार जाहीर

सलमान- शाहरुख पेक्षाही श्रीमंत आहे बॉलिवूड मधील ही बेस्ट फ्रेंड जोडी आहे जास्त श्रीमंत ; संपत्ती ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT