WhatsApp AI Feature : व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवे फीचर्स आणत असते. Meta AI सह अनेक नवीन अपडेट्सनंतर आता कंपनी 'चॅट मेमरी' नावाचे नवे फीचर घेऊन येत आहे. या फीचरच्या मदतीने Meta AI वापरकर्त्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती लक्षात ठेवणार आहे, ज्यामुळे व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव आणखी सोपं आणि चांगला होईल.
WABeta च्या अहवालानुसार, 'चॅट मेमरी' फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांच्या आवडी-निवडी, आहार पद्धती, जसे की शाकाहारी किंवा विशिष्ट खाद्यपदार्थांची अलर्जी यासारखी माहिती Meta AI लक्षात ठेवणार आहे. (WhatsApp Chat Memory Feature) यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार अधिक योग्य सल्ले आणि सूचना मिळणार आहेत. उदाहरणार्थ, जर वापरकर्ता शाकाहारी असेल, तर Meta AI त्यानुसार पदार्थांच्या रेसिपी सुचवेल.
याशिवाय, हे फीचर वैयक्तिक दिवसांच्या आठवणी ठेवून, वाढदिवस किंवा इतर खास प्रसंगी देखील संबंधित सूचना देऊ शकतो. वापरकर्ते Meta AI ला कशापर्यंत माहिती द्यायची आणि काय लक्षात ठेवायचे हे पूर्णपणे नियंत्रित करू शकणार आहेत. त्यामुळे, वैयक्तिक गोपनीयता सुरक्षित राहील.
अर्थातच, या प्रकारच्या मेमरी फीचर्सवर पूर्वी काही कंपन्यांनी टीका केली आहे, कारण त्याने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र, WhatsApp ने यासंबंधी वापरकर्त्यांना माहिती डिलिट करण्याचा आणि अपडेट करण्याचा संपूर्ण अधिकार देण्याचे आश्वासन दिले आहे. हे फीचर लवकरच बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे, त्यानंतरच वापरकर्त्यांना याचा चांगल्या प्रकारे अनुभव घेता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.